जिव्हाळा जेष्ठ नागरिक - "अविस्मरणीय सुवर्ण क्षण"

 



श्री.बबनराव भैरवकर  यांचा "अविस्मरणीय सुवर्ण क्षण"  .......यावर एक दृकश्राव्य माध्यमातून कार्यक्रम जिव्हाळा जेष्ठ नागरिक संघानी आयोजित केला होता. आंनद, दुःख, विनोद आणि संगीत यावर आधारित कार्यक्रम.


सध्या पंढरीची वारी सुरु असल्याने - गायक अजित कडकडे यांचा रूप पाहता लोचनी हा विडिओने सुरवात झाली.  अशोक नायगावकर पुणेरी लोक यावर विनोदाचा व्हिडिओ,  अकोर्डीअन  वर .. . मेरा जुता है जापानी...नितीन करमलकर यांचा  आजार बाबत विनोदी विडिओ  ...इंडियन आयडॉल.. कट्यार काळजात घुसली... सुरत पिया की.  अत्रेंचे . शामची आई सिनेमातील . भरजरी पितांबर ,  संकर्षण कऱ्हाडे  यांचा .. आई वरील कविता,  मोरूची मावशी..दिलीप प्रभावळकर यांचा चिमणराव गुंड्याभाऊ,  सुख म्हणजे नक्की काय असते... कार्यक्रमाची सांगता  आशा भोसले यांनी गायलेले जीवलगा कधी रे येशील .. हा दुर्मिळ विडिओ  यांनी झाली .  बाहेर पाऊस पडत होता ..  सभादांनी एक तास कार्यक्रमाचा आनंद लुटला .. कार्यक्रमानंतर चविष्ट भाजी यावर ताव मारला ...  श्री बबनराव भैरवकर यांना मनापासून धन्यवाद ..खुसखुशीत 


भजीसाठी जिव्हाळा संघाचे आभार आणि धन्यवाद 🙏🙏 मजा आली..👍प्रार्थना, ध्येयगीत, जुलै महिन्यात साजरे केले जाणारे सभासदांचे वाढदिवस सत्कार, शेवटी पसायदान ...यांचा समावेश होता.



Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा