जिव्हाळा जेष्ठ नागरिक संघ -संतकवीयत्री कान्होपात्रा
संतकवीयत्री कान्होपात्रा - यावर सौ. वैशाली देशमुख यांचा भाषणाचा कार्यक्रम जिव्हाळा जेष्ठ नागरिक संघ यांनी आयोजित केला होता. मंगळवेढा या गावी शामा या गणिकेच्या पोटी जन्म.. बालपणी श्रीकृष्णाची भक्ती. सांभाळ करण्याऱ्या हौसाबाई या विठ्ठल अभंग म्हणायचे. आपण देवाचे सेवक आहोत पण आपणास इतरांप्रमाणे राहता येत नाही याबाबत कान्होपात्रा हिच्या मनात शंका.. गणिकेची मुलगी असल्यामुळे समाजात योग्य स्थान नव्हते. अप्रतिम सौंदर्य लाभलेले जणू अप्सरेचा तारुण्य. पण नशिबी संसार सुख नाही... पंढरीची वारी.. दिंडी सहभाग...पांडुरंगाचे दर्शन... कळकळीची विनंती... मन शुद्ध शांत झाले... समाज बद्दल बंड.. समाज मानत नाही...उपजिविकेसाठी पांडुरंग.. भक्ती..23 अभंग लिहिले आहेत. नामस्मरण. महत्व.. नको देवराया अंत.. अभंग... देवळात सुचला... देवत्व भक्ती याची प्रचिती बादशहास आली आणि त्याने कान्होपात्राचे समाधी मंदिर बांधण्यास सांगितले . सौ. वैशाली देशमुख या बँकेत नोकरीत होत्या. त्यांनी कान्होपात्रा यांच्या जीवनाविषयी अभ्यास करून निरीक्षणे केली आहेत. सारे सभासद तल्लीन होऊन भाषण ऐकत होते.

Comments
Post a Comment