वाचनकट्टा -21 - "हरवलेल्या कर्णफुलांचे रहस्य " -
"हरवलेल्या कर्णफुलांचे रहस्य " - सुधा मूर्ती यांच्या - The magic of lost errings - इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद - अनुवादक लीना सोहोनी - आपल्या उत्तर भारतातील सहलीत एक ऍटीक रत्नजडित कर्णफुलांची जोडी अनुष्काच्या हाती पडते. कर्णफुलांच्या वर असलेल्या एक दुकानाच्या नाव याचा पत्ता शोध सुरु होतो. अमृतसर, दिल्ली येथून थेट लंडन येथपर्यंत शोधप्रवास चालू राहतो. शेवटी लंडन येथे खरा मालक यांचा शोध लागतो. खऱ्या मालकीणबाई यांच्याकडून पाकिस्तान फाळणी वेळीच्या आठवणींना उजाळा मिळतो आणि कर्णफुलांचा इतिहास कळतो. हे रहस्य वाचनीय आहे. पुढे काय होते याबाबत उत्कंठा लागते. सुधा मूर्ती यांचे हे ५० वे पुस्तक (१८ कन्नड आणि ३२ इंग्रजी) वाचनीय आहे.



Comments
Post a Comment