कर्नल्स क्यूब - CPR जीवनाची संजीवनी"
सीपीआर म्हणजे कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन. या आपत्कालीन जीवनरक्षक प्रक्रिया बद्दल माहिती सर्वसामान्यांना असणे अत्यंत गरजेचे आहे असे मत डॉ. मंदार अक्कलकोटकर यांनी " -CPR जीवनाची संजीवनी" या कर्नल्स क्यूब संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले. माणसाला भय मृत्यूचे असते. जेव्हा श्वास, हृदय आणि मेंदू बंद होतो तेव्हा माणसाचा मृत्यू होतो. जीवनाची संजीवनी असलेल्या सीपीआर याबाबत विस्तृत माहिती देताना सी पी आर कोणाला द्यायचा, कोणाला नाही, कसा द्यावा आणि इतर प्राथमिक उपचाराबाबत थोडक्यात माहिती श्रोत्यांना सांगितली. बेशुद्ध झाल्यावर माणसाला शुद्धीवर आणण्यासाठी प्राथमिक उपाय काय करायचे, काय करू नये, सुरक्षितपणा, रक्तस्राव झाला असता काळजी घेणे, १०८ या सेवेबाबत अधिक माहिती दिली. न घाबरता "१०८" या यावर फोन करून रुग्णाबाबत माहिती आणि लोकेशन इतर माहिती व्यवस्थित देणे महत्त्वाचे असते. हृदयविकाराच्या वेळी हे ASPRIN ही गोळी रुग्णास देणे यासारख्या इतर काही छोट्या छोट्या टिप्स डॉक्टरांनी सांगितल्या. शेवटी सी पी आर कसा द्यायचा, कोठे, वेगाबाबत ... याचे प्रत्यक्ष करून दाखवले.काहीजणांनी सीपीआर प्रत्यक्ष करून पाहिला. भाषणानंतर श्रोत्यांच्या शंकांचे निरसन डॉ. मंदार अक्कलकोटकर यांनी समाधानपर केले. मे महिन्याच्या सुट्टीनंतर संस्थेचा हा पहिलाच कार्यक्रम होता. शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थिती कमी असली तरी डॉ. मंदार यांनी थोडक्या अवधीत प्राथमिक उपचार आणि सीपीआर याबाबतच्या सांगितलेली माहिती अत्यंत उपयोगाची आहे आणि त्याचा वापर केला तर नक्कीच एखाद्याला जीवनदान मिळू शकते असे मत संस्थेचे सर्वेसर्वा कॅप्टन फुले साहेब यांनी आपल्या आभारप्रदर्शनात मत व्यक्त केले. या श्रवणीय आणि उपयुक्त कार्यक्रमाबाबत कर्नल्स क्यूब संस्थेचे आभार आणि धन्यवाद. जय हिंद. चंद्रशेखर मधुकर कुलकर्णी
Comments
Post a Comment