जिव्हाळा जेष्ठ नागरिक संघ - "कृष्णगाथा"

 




श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित गीतांचा कार्यक्रम "कृष्णगाथा"  जिव्हाळा जेष्ठ नागरिक संघ यांनी आयोजित केला होता. कृष्णाचा जन्म, पाळणा, मित्रप्रेम, भाऊ-बहीण  प्रेम आणि इतर कृष्णलीला या विषयावर जवळ जवळ 15 गाणी संघातील भगिनी योगिनी आणि त्यांच्या साथीदार गायक भगिनी यांनी सादर केला. गायनाबरोबर तबला, हार्मोनियम, पखवाज, टिपऱ्या आणि टाळ, संचलन.. यांची उत्तम साथ कार्यक्रमास लाभली.  प्रत्येक गाण्यानंतर श्रवणीय शंखनाद करण्यात आला. दीड तासाच्या या कार्यक्रमास उपस्थित सभासदांनी भरभरून दाद दिली. प्रथेनुसार कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना, ध्येयगीत आणि जून महिन्यातील सभासदांचे वाढदिवस शुभेच्छा यांनी झाली.  अधिक मासनिमित्य या श्रवणीय  कार्यक्रमाबद्दल ज्येष्ठ नागरिक संघ यांचे आभार आणि धन्यवाद. देवाची उपासना आणि नामस्मरण आपण अधिक वाढवूया. श्रीराम जय राम जय जय राम. शेवटी लवकरात लवकर पाऊस दे हीच प्रार्थना भगवान श्रीकृष्ण चरणी व्यक्त करूया. धन्यवाद. चंद्रशेखर मधुकर कुलकर्णी


1)अचत्यम् केशव नारायण...2) जन्म पाळणा. हले हा नंदाघारी पाळणा 3) कृष्ण रंगायला नंदाच्या घरी रांगतो हरी...4) गोपीचे मन.. रुसला मजवरीती कान्हा.. 5) विष्णूची स्तुती वैकुंठीचा राणा तूची नारायणा 6) देवाचे नामस्मरण ,नाम घेता तुझे गोविंद...7) गोपीचा आनंद .. किती सांगू मी...आज आनंदी  8) कृष्णाचे मित्र प्रेम भाऊ बहीण प्रेम... जगावेगळा याचक आणि धनी...9) भरजरी पितांबर द्रौपदीस शोभे नारायण 10) मधुवंती च्या  सुरासुरातून अलवाते...11) राधा कृष्णावरी भाळली 12) घट डोईवर घट कमरेवर...13) कृष्ण गाथा एक गाणे जाणते एक तारी सूर गाणे 14) अरे कृष्णा अरे कान्हा.. गवळण 15) एकनाथ महाराज हरी म्हणा कोणी गोविंद म्हणा





Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा