"सायकल " दिनानिमित्त
लहानपणी चिकोडी गावात असताना सायकल शिकण्यासाठी सायकल भाड्याने मिळत असे. शाळेच्या पटांगणावर सायकल घेऊन शिकण्याचा सराव करत असे शिकताना पडून पायाला, गुडघ्याला जखमा व्हायच्या. त्या जखमा बरे व्हायला तीन-चार दिवस लागत. आमचे दादा शुक्रवारी ऑफिस करून गावावरून आल्यानंतर स्टॅन्ड वरून सायकल घेऊन सामानसह घरी येत. घरी आल्यानंतर ती सायकल परत करण्यासाठी आम्हा भावंडांना पैकी कोणाचा नंबर लागतो याची वाट पाहत असू. घर ते स्टॅन्ड जवळ जवळ दीड किलोमीटर अंतर होते सायकल दिल्यानंतर चालत यायचे त्यामुळे थोडा आळस कंटाळा करत असू. घरापासून कॉलेज जवळजवळ तीन किलोमीटर असे. सायकलीवरून दोन किलोमीटर अंतरावरून पिण्याचे पाणी आणणे, बाजारातून धान्य आणि भाजी घेऊन येणे. कोणी नातेवाईक गावावरून येणार म्हटल्यावर सायकल घेऊन स्टॅण्डवर जाणे. चिकोडीत असताना जवळपासच्या खेड्यात ना सायकल वरून भेटी दिल्याचे आठवते. त्यामध्ये चिंचणी, हिरेकुडी, दड्डी, नागराळ, परटी नागाप्पा, घटी बसवण्णा, रामलिंग मारुती मंदिर, संकेश्वर, .. कधी कधी शॉर्टकट साठी म्हणून ओढ्यामधून सुद्धा सायकल दामटत असे. अकरावी मध्ये असताना चिकोडी नृसिंहवाडी हा लांबचा सायकल प्रवास केल्याचे आठवते. सायकलीवरून कधी कधी ट्रिबल सीट जात असू माझा नंबर कधी पुढे कधी मागे.. काही वेळानंतर बसलेला पाठीमागचा भाग कुरबुर करत असे.1984 साली नोकरीनिमित्त पुण्यात आल्यावर चिकोडी गावातील सायकलचा संबंध संपला. पैसे मिळवू लागलो पुण्यात आलो शिंगे फुटली.. त्यामुळे सायकल वापर जवळजवळ बंद झाले. आज सायकल दिनानिमित्त सायकलीमुळे चिकोडी गावातील बालपणीचे दिवस किती सुखकारक आणि आनंदही होते याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.आज सायकल डे निमित्त सायकल प्रवासाच्या आठवणी जाग्या झाल्या.. त्या तुमच्याशी शेयर केल्या .. धन्यवाद ..
Comments
Post a Comment