वाचनकट्टा -20 - मनुस्मृति - आहे तरी काय ? - लेखक वा. ना. उत्पात

 







मध्यंतरी हिंदू संमेलनाच्या भाषणावेळी शरद  पोंक्षे यांनी श्रोत्यांना  किती जणांनी मनुस्मृति वाचली आहे? मनुस्मृती न वाचताच त्याचा निषेध करणे हे बरोबर नाही. परवा ग्रंथालयात गेलो होतो. तेथे "मनुस्मृति - आहे तरी काय" - हे पुस्तक मिळाले. पुस्तकाचे लेखक वा. ना. उत्पात आपल्या मनोगतात म्हणतात मनुस्मृतीची निंदा करणाऱ्या लोकातील 99% लोकांनी ही वाचलेली नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणून मनुस्मृती आहे तरी काय?  हे सामान्य लोकांना समजावे म्हणून हे पुस्तक लिहिले. मनू स्मृतीतील  निवडक आजच्या काळाला उपयोगी ज्यावर वाद  विवाद होणार नाही असे 270 श्लोक निवडून त्यावर भाष्य केले आहे. माणसाचे राहणीमान, जीवनमान कसे असावे, दिनचर्या कशी  असावी, आहार, विहार, अंधश्रद्धा, स्त्रियांचा गौरव, समाधान स्त्री, संसारात पती-पत्नीचे नाते, ज्ञान, राजकारभार कसा चालावा? शिक्षा दंड, विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या गोष्टी टाळाव्या या अशा आणि अनेक विषयावर 269 श्लोक आणि विवेचन या पुस्तकात आहे. ज्या गोष्टी कालबाह्य झाल्या त्या सोडून बाकी इतर उपयुक्त गोष्टी आचरणात आणायला हरकत नाही. पुस्तक जरूर वाचावे. 










Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा