वाचनकट्टा -19 -तृषार्त पथिक ले. राधानाथ स्वामी.
तृषार्त पथिक ले. राधानाथ स्वामी. अमेरिकेतील शिकागो ते भारतातील वृंदावन हा आध्यात्मिक जीवनाचा प्रवास श्री राधानाथ स्वामी यांनी या पुस्तकामध्ये विस्तृतपणे मांडला आहे. अमेरिकेतून युरोप मध्य आशिया, येथून भारतात केलेला प्रवास. प्रत्येक देशात आलेले विचित्र अनुभव आणि शारीरिक आणि मानसिक ताप सहन केला. गंगामाई चे बोलावणे आणि श्रीकृष्णाची भक्ती या प्रेरणेने प्रत्येक ठिकाणचे आध्यात्मिक अनुभव सुंदर आणि सोप्या शब्दात या पुस्तकात व्यक्त केले आहेत. भारतामध्ये आणि नेपाळ देशात अनेक प्रसिद्ध पवित्र ठिकाण आणि मंदिरे यांना भेटी दिल्या. आपल्या गुरुच्या शोधासाठी त्यांनी दलाई लामा, आनंदमयी मा, योगगुरु बीके अय्यंगार, श्रील प्रभु पादस्वामी, काही नागा साधू यांच्या भेटी घेतल्या. मान अपमान, सुखदुःख शारीरिक कष्ट आणि ताप सहन करत अध्यात्मिक जीवनात बरीच प्रगती केली. हे आत्मवृत्त वाचताना पुढे काय होणार याची नेहमीच उत्कंठा निर्माण होते. या पुस्तकास श्री बाबासाहेब पुरंदरे आणि प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे आशीर्वाद लाभले आहेत. ज्यांना अध्यात्मिक क्षेत्राची आवड आहे त्यांनी हे अमेरिकी संन्यासाचे रोमांचक आत्मवृत्त जरूर वाचावे. माझ्या धाकट्या भावाने हे पुस्तक वाचले आणि नंतर मला आवर्जून वाचण्यास सांगितले. "तुषार्त पथिक" हे पुस्तक वाचनीय आहे. हरे कृष्णा..हरे राम..🙏
Comments
Post a Comment