" Let's learn physiotherapy at HOME - डॉ. लीना पराग औटी

 



१४ डिसेंबर २०२४ - " Let's   learn physiotherapy at HOME - या विषयावर डॉ. लीना पराग औटी यांचे व्याख्यान आयोजित केले होते.  physiotherapy मुळे आपले जीवनमान कसे सुधारते याबाबत सुरुवातीस सांगितले.  आपला आत्मविश्वास, सशक्त, चलनवलन यामुळे आपले जीवन सुखकर बनते.  ६५ वयानंतर चालताना, रस्ता क्रॉस करताना आत्मविश्वास कमी होतो, काहीजणांना सकाळी उठल्यावर शरीरास जडपणा जाणवतो, अंगदुखी, सांधेदुखी त्रास,बुटाची लेस बांधताना त्रास होतो. Mobility & balance go hand in hand 


व्यायाम, मानसिक आरोग्य, बसणेउठणे पद्धत, यामुळे आपला शरीराचा समतोलपणा राखण्यास फायदा होतो. कसे उभे राहावे, मानेचे, हातपाय कंबर,मांड्या..यांचे विविध व्यायाम कसे करावे, वजनदार वस्तू कशी उचलावी, समतोलपणा साठी चालण्याचे व्यायाम, आपली मसल शक्ती वाढवण्यासाठी व्यायाम, मनगट, बोटे यांचे व्यायाम बाबत प्रात्यक्षिके आणि पडद्यावर माहिती सविस्तर सांगितली. आऊटडोअर activities - चालणे, योग, बागकाम, सायकलिंग..  व्यायामबाबत अतिरेक आणि काय टाळावे, काय काळजी घ्यावी - आपले शरीराचे शेवटी ऐकले पाहिजे..आजकाल मोबाईल वापरताना मानेची घ्यावयाची काळजी..२०:२०:२० posture नियम..नेहमी ऍक्टिव्ह राहावे.. नियमित योग्य आहार, औषधपाणी वेळेवर घेणे, आपला बॅलन्स व्यव्यस्थित राखून आपण पडू नये याबाबत काळजी...बाथरूम मध्ये अँटी स्किड फरशी असणे, जिन्यावरून जाता येता रेलिंगचा वापर, पायाची काळजी,  बूट कोणते वापरणे..याबाबत श्रोत्यांना टिप्स दिल्या. 


आपले मानसिक आरोग्य बाबत - नेहमी मित्रमंडळ, नातेवाईक यांच्याशी संपर्क, व्यायाम, छंद जोपासणे- शब्दकोडी, सुडूको, वाचन, नवीन गोष्टी शिकणे, ध्यानधारणा, योग, संगीत, ऐकणे.. आपले दिनचर्या सांभाळणे..आपल्या जीवनाचे उद्देश्य ठरवणे.. इकिगय ..UNO  यांनी आरोग्य बाबत संज्ञा..याबाबत आपले विचार व्यक्त केले. " Exercise is King, Nutrition is Queen, put them together and you have got a Kingdom "


श्रोत्यांच्या शंका आणि आरोग्य व्यायाम बाबत प्रश्न समाधानकारक उत्तरे देऊन आपल्याला जमेल तितका आणि तसाच व्यायाम करावा असा सल्ला देऊन भाषणाची सांगता केली.  उपस्थित श्रोत्यानी जमेल तसे खुर्चीत बसून व्यायाम करून श्रवणीय भाषणाचा आनंद लुटला. कर्नल फुले यांनी २०२४ साल याची सांगता  या उत्तम कार्यक्रमामुळे झाली असे सांगून डॉ.लीना यांचे आभार मानून धन्यवाद दिले. आज दत्तजयंती - सर्वाना उत्तम आरोग्य लाभून मानसिक स्वास्थ लाभो हीच श्री दत्तगुरुंना मनोभावे प्रार्थना.. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा...

Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा