अयोध्या मंदिर निर्मिती - सौ. अश्विनी कवीश्वर
30 नोव्हेंबर २०२४ - कर्नल्स क्यूब संस्थेने अयोध्या मंदिर निर्मिती - एक आव्हान या विषयावर सौ. अश्विनी कवीश्वर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. अयोध्या नगर राममंदिर उध्वस्त, इतिहास बाबत पूर्वपीठिका, रंजनभूमी कोर्टातील वाद, साक्षी पुरावे सादरीकरण आणि लढा कसा जिंकला याबाबत सविस्तर बाबी माहिती सांगितली. जागेबाबत वाद मिटल्यावर मंदिर बांधकाम बाबत ट्रस्ट निर्माण करून बांधकाम कमिटी स्थापन केली जणी. सौ. अश्विनी कवीश्वर यांची बांधकाम समितीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून निवड झाली. राममंदिर बांधणी मध्ये निवड झाल्यावर झालेला रोमांचकारी आनंद कथन केल्यावर श्रोते अवाक झाले. राममंदिर पायापासून बनलेले भव्य राममंदिर बाबत बांधकामाबाबत तांत्रिक माहिती, कमिटी मिटींग्स, चर्चा, स्थानिक सामाजिक संस्था, रामभक्तांचा सहभाग, पायाभरणी समारंभसमयी पंतप्रधान यांचे मंदिर कसे असावे बाबत विचार, जागेवरील सेक्युरिटी, मंदिर बांधणीबाबत देणगी याबाबत भक्तांचा उदार आणि दानीवृत्ती, निस्वार्थी सेवा, ट्रस्टच्या मुख्य अधिकारी यांच्या सूचना, पाहणी, अत्यंत साधी राहणी, कामगारांनी घेतलेले अविरत कष्ट, पवित्रमयी आणि श्रद्धाळू वातावरण .. याबाबत आपले अनुभव सांगून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
अयोध्या नगरातील - शरयू नदी घाट, हनुमान गढी, राममंदिर आसपास परिसर, भक्तांसाठी सोयी, याविषयी अधिक माहिती सांगितली. बांधकाम वेळी करोना रोग साथीमुळे अडथळा आणि त्यावर मात, उपाय, ही जबाबदारी पार पाडत असताना कुटुंबियांचे, शेजारीपाजारी, मित्रमंडळी आणि अनेक रामभक्त यांचे शेकडो आशीर्वर पाठीशी लाभले. बांधकाम करत असताना आपल्या वर्गमित्राची - वाल्मिकी प्रतिष्ठान पूजा याबाबत रोमांचक अनुभूती कथन केली. राममंदिर बांधकामवेळी बरीच हनुमान सेना - हजर असायची. काही माकडे ऑफिस, जागेवर येऊन बांधकाम कसे चालले आहे पाहणी करीत. त्यांना काही इजा होणार नाही याची दक्षता घेतली जायची.
आपल्या सव्वा दोन तासाच्या भाषणात काही तांत्रिक बाबी असलीतरी आपले वेगवेगळे अनुभव कथन करून श्रोत्यांना एका खिळवून पुढे काय ही उत्कंठा निर्माण केली. सारे श्रोतुमंडळी जीवाचे कान देऊन तल्लीन झाले होते. वेळेअभावी भाषण थोडे आवरते घ्यावे लागले. भाषण संपल्यावर बऱ्याच मंडळी कृतकृत्य होऊन मनोमनी नतमस्तक भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. अर्थात ही सारी रामाची कृपा यात शंका नाही. हा संस्थेचा सर्वात मोठा कार्यक्रम अशी कबुली देत सौ. अश्विनी कवीश्वर यांचे आभार मानताना श्री फुले यांनी धन्यवाद दिले. या अत्यंत श्रवणीय कार्यक्रमाबाबत संस्थेचे मनापासून आभार आणि धन्यवाद..प्रत्येकानी अयोध्या येथील राम मंदिरास जरूर भेट द्यावी हीच प्रार्थना..श्रीराम जय राम जय जय राम...जय श्रीराम.. चंद्रशेखर मधुकर कुलकर्णी
Comments
Post a Comment