सरस्वती निवास - भूमीपूजन -०७.११.२०२४
आमच्या Angal & Co यांचा गोहाड कुटुंबियांनी दिलेला रिडेव्हलोपमेंट प्रकल्प - "सरस्वती निवास" याचा भूमिपूजन सोहळा पार पडला. भूमिपूजा नंतर सोनिया ओगले यांनी प्रकल्पाची माहिती सांगितली आणि गोहाड कुटुंबियांना सुंदर घरे बांधून देण्याचे आश्वासन दिले. गोहाड कुटुंबियांनी घरांबाबत ४० वर्षांपूर्वीच्या आठवणी जागवल्या. आपल्या घरांबाबत काहींनी सुंदर कविता व्यक्त करून आपले विचार मांडले. श्री मनीष वामन गोहाड यांनी कुटुंबियांना एकत्र आणून कंपनी बरोबर प्रकल्पाबाबत अथक परिश्रम घेतले. मनीष याने ४० वर्षांपूर्वीचा घर कसे निर्माण झाले याबाबत इतिहास आणि पूर्वजांनी घेतलेले कष्ट याबाबत सविस्तर लेखाजोखा सादर केला. गोहाड कुटुंबियांचे सलोख्याचे संबंध, प्रेम, आपुलकी, कलागुणदर्शन, नातेवाईकांची नावे - आणि वारसा वाटणी - इच्छापत्र या काही आठवणी कथन केल्या. आपल्या भाषणाचा सुंदर समारोप स्वरचित कविता - "घरांबाबत" सादर करून केला.
या प्रसंगी २० वर्षांपूर्वी मी आणि मनीष बँकेत एकत्र काम करीत असताना आम्हाला मनीषच्या घरी भेट देण्याचा योग आला होता. मनीषच्या बदलीनंतर मनीषच्या वडिलांनी मला एक सुंदर पत्र पाठवले होते. मनीषनी आपली स्वरचित श्री दत्तगुरु यांच्यावर एक भक्तीगीत रचले होते ते त्यांनी मला लिहून दिली होती . पत्र आणि गीत मी जपून ठेवले आहे. काय योगायोग आज गुरुवार - "दत्ताचा" वार. गत स्मृतींना उजाळा ... या वास्तूतील आठवणी मनात "घर" करून राहतात हेच खरे... नाही का ...?
सरस्वती निवास ही भव्य आणि दिव्य वास्तू लवकर आपल्या मनाप्रमाणे साकार हो आणि वास्तूमधील गोहाड कुटुंबीयांचा नव्या वास्तूत सुखसमाधान, शांती आणि सुआरोग्य लाभो हीच श्री दत्तगुरु आणि श्री चत्तुश्रींगी देवी चरणी प्रार्थना..शुभम भवतु चंद्रशेखर मधुकर कुलकर्णी - ०७.११.२०२४
Comments
Post a Comment