मी काय वाचले - 26

 



मी काय वाचले - 26  - माझे महाराज - श्रीसद्गुरू ब्रह्मचैतन्यमहाराज गोंदवलेकर  



श्री गोंदवलेकर महाराज यांचे चरित्र या पुस्तकाचे संपादक आणि संकलक श्री शैलेश रा.ढेरे.  या पुस्तकात महाराजांचे संक्षिप्त चरित्र आहे.  यात व्यक्तीदर्शन, विशिष्ट गुणदर्शन, पारमार्थिक दृष्टांत,महाराजांच्या सहवासातले  मंतरलेले दिवस,महाराजांनी रचलेले अभंग,पाठ, अमृतवाणी, हितोपदेश, साधकांनां केलेले मार्गदर्शन,बोधवचने, जीवनपट, महाराजांचे हस्ताक्षर,मानसपूजा.. याबाबत संकलन आहे.  हे पुस्तक अत्यंत साधे,सामान्यांना समजण्यास सोपे असे अतिशय सुंदर आहे. महाराजांचा साधेपणा, नामस्मरणाबाबत कळकळ, भक्ताविषयी प्रेम, आपुलकी हे गुण मनास भावून जातात.  मी गेली १२ वर्षे महाराजांचा नित्यपाठ दररोज वाचत आहे. या पुस्तकात आणि माझे महाराज या पुस्तकात एक प्रकारचे चैतन्य अनुभवले.  अर्थात महाराजांना "ब्रह्मचैतन्य" का म्हणतात हे कळले.  हे पुस्तक भक्तांनी जरूर वाचावे.

Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा