जपान -11

 


ओसाका - १९.१०.२०२४ 


टोकियो स्टेशनवरून ओसाका साठी बुलेट ट्रेन पकडली. यास येथे शिंकासेन म्हणतात. या ट्रेनचा वेग तशी ३२० km असतो.   या ट्रेन मधील सर्व सुखसोयी जणू विमानांप्रमाणे आहेत. वेग ताशी ३२० कमी असलातरी आत बसल्यावर अजिबात जाणवत नाही.  यातील काही बोगी विना आरक्षित असतात. प्रवासात ३-४ स्टेशनवर गाडी थांबते. आजूबाजूचा निसर्ग, झाडे, बोगदा, काही भागातील उंच इमारती हे पाहता ओसाका कधी आले कळले नाही. ही गाडी दर २० मिनिटांनी आहे.  शिंकासेन गाडीचे तिकिट माणशी १७००० येन आहे. ओसाका स्टेशन हे सर्वात मोठे आणि प्रवासी वर्दळ स्टेशन.  तीन टोलेजंग इमारती च्या मध्यावर हे स्टेशन ३ मजली भागात वसलेले ६ वेगवेगळ्या ट्रेन विभागाशी जोडलेले आहे. आजूबाजूस हॉटेल्स,शॉपिंग मॉल्स,आणि इतर करमणूकी मॉल्स, सरकते जिने.  ओसाका ट्रेन स्टेशन भव्य आणि दिव्य आहे. स्टेशनवरून बाहेर येऊन भारतीय हॉटेल शोधून जेवण करून आमच्या निवासी ठिकाणी आलो.


ओसाका castle  ही सोळाव्या शतकातील वास्तू,  या वास्तू आजूबाजूस मोठी सुंदर पार्क आहे. काही भागात टॉय ट्रेन आहे. २-३ तास लागतात हे ठिकाण पाहण्यासाठी..सुटी दिवशी काही कुटुंब मित्र मैत्रिणी भेटून सहभोजन आणि मजा करतात 


ओसाका भागातील मिनॅटो येथे ओसाका aquarium हे ८ मजली भागात आहे. पहिल्या भागात जपानमधील जंगले, काही भागात पक्षी, प्राणी, पॅसिफिक महासागरातील विविध मासे, शार्क मासे, जगातील सर्व समुद्रातील अगदी बटन ते मोठाले आकाराचे मासे, पानजलचर प्राणी, कासव हे प्राणी २७ टॅन्कमध्ये ठेवलेले आहेत. काचेमधून खूप सुंदर दिसतात.  हे पाहायला जवळजवळ ३ तास लागतात.  आजूबाजूस इतर करमणूकी साधने.. राऊंड व्हील, आणि हॉटेल्स आहेत. हे acquarium जरूर पाहावे.नंबा येथील नंबा यासाका shrine भेट दिली.  येथे प्रसिद्ध केक मिळतो


Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा