जपान -10
गोथेम्बा - १२.१०.२०२४
आम्ही ट्रेन ने या स्टेशन वर पोहचलो तेथून चालत बस स्टॉप येऊन गोथेम्बा येथे जाणारी बस मिळाली. बस फुल्ल होती. दोन आसनाच्या मध्ये एक मिनी सीट असते. यावर आपण बसू शकतो. बसमध्ये वॉशरूम ची पण सोय होती, याचा अनुभव घेतला. ही कल्पना मला आवडली. कमीतकमी जागेचा जास्ती वापर. लागून सुटी असलेमुळे बरीच गर्दी होती. तीन लेन रोड सगळी वाहने व्यवस्थित अंतर ठेऊन चालवत होती. लेन शिस्त, संयम आणि आधी दुसऱ्या वाहनास जाऊ देणे हे सर्व कौतुकास्पद.. प्रवासात स्टॉप येण्याआधी स्पीकर वर माहिती दिली जाते. हा भागात घाट असल्यामुळे दोन्ही बाजूस हिरवीगार झाडे, सुंदर स्वच्छ रस्ते ..कोठेच हाडदे बसत नाही.. प्रवासात बोगदे ..पाहून मन प्रसन्न होते. तीन तास प्रवास कसा पार पडला कळले नाही. आणि गोथेम्बा स्टेशन आले. जपानमधील माऊंट फुजी याचा गोथेम्बा ठिकाण ..हा एक पायथा सुरवात आहे. बसमधून उतरल्यावर भूक लागली होती म्हणून येथील भारतीय हॉटेलमध्ये जेवण घेतले आणि नंतर भटकंती सुरु...
गोथेम्बा प्रीमियम आउटलेट -
जपानमधील सर्वात प्रसिद्ध शॉपिंग मॉल म्हणजे गोथेम्बा प्रीमियम आउटलेट. याठिकाणी २१० शॉपिंग मॉल्स आहेत. या मोठ्या आवारात चार मजली भागात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड ची कपडे, घड्याळ, महिलांचे प्रसाधन, खेळ, बूट हॉटेल्स, चॉकोलेट आणि अनेक वस्तू याचे मॉल्स आहेत. याठिकाणी सर्वात वरच्या मजल्यावर माऊंट फुजी याचे दर्शन होते. पण आम्हाला दर्शनाचा लाभ झाला नाही कारण ढग आले होते. पण सूर्यास्थ याचे सुंदर दर्शन घडले. संध्याकाळी साडेचार वाजत सूर्यास्थ होतो. बरेच विदेशी प्रवासी या भागास भेट देण्यास येतात आणि बरीच गर्दी होती. मॉल्समधील वस्तूंचे भरमसाठ भाव पाहून आम्ही नुसते विंडो शॉपिंग केले. जपानमधील लोक याभागात खरेदीसाठी वीकएंड्ला येतात. गोथेम्बा स्टेशन पासून नेआण करण्यासाठी दर १५ मिनिटास बसची सेवा मोफत केली आहे. हे भव्य शॉपिंग मॉल पाहण्याजोगे आहे. काही भागात सरकते जिन्याची सोय असली तरी आपली भरपूर चालण्याची तयारी हवी. हे ठिकाण मात्र पाहण्याजोगे आहे. येताना मात्र आम्ही रेल्वेचा प्रवास तीन चार ठिकाणी लाईन्स बदलत थकून भागून घरी परतलो. जपान मधील बस आणि रेल्वे प्रवास सोय उत्तम आणि सुंदर.
Comments
Post a Comment