पाचवे स्नेह संमेलन - Dark Forest रिसॉर्ट, आंबोली

 




आमच्या वर्गमित्रमैत्रिण यांचे पाचवे स्नेह संमेलन १६,१७ ऑगस्ट रोजी Dark Forest रिसॉर्ट, आंबोली येथे पार पडले. आंबोली येथील आंबोली धबधबा येथे सर्वानी धबधब्यात भिजण्याचा आनंद लुटला.  त्यादिवशी वरमहालक्ष्मी दिनी हळदीकुंकू कार्यक्रम पारंपरिक रिवाजाप्रमाणे पार पडला.  कोरावके वर काही गायकांनी हिंदी मराठी गाणी आणि स्तोत्रे म्हटली.  संगीतावर सर्वानी नाच केला.  संगीताचा कार्यक्रम जोरात झाला.  १८ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता जंगल सफारी साठी प्रयाण केले. वन विभागांनी ही सहल आयोजित केली आहे. यात १) नांगर तास धबधबा २) कावळेसाद धबधबा ३) हिरेणकेशी मंदिर ४) महादेवगड ५) वनउद्यान असे ५ पॉईंट्स दाखवले जातात.  हे सर्व ठिकाणे निसर्गरम्य परिसरात आणि सुंदर आहेत. सर्वात हिरेणकेशी मंदिर हा रमणीय आणि शांत परिसर मनास आत्मिक समाधान देऊन गेला.  येथे हिरेणकेशी नदीचा उगम आहे. जंगल सफारी वाहनातील मंडळींचा आवाज आणि दंगा यामुळे वनामध्ये एकही जंगली प्राण्याचे दर्शन झाले नाही.असो.


 दुपारी दोन वाजता जोरात पाऊस पडला.  पाऊसामुळे वेंगुर्ला समुद्र किनारी जावे की कसे असे विचार चालू होता. जेवणानंतर थोडा पाऊस कमी झाल्यावर तीन वाजता वेंगुर्ला किनारी आम्ही कूच करत संध्याकाळी ५ वाजता किनारी पोचलो.  किनारा अत्यंत स्वच्छ आणि सुंदर आहे. अधूनमधून पाऊस सुरु होताच. समुद्रकिनारी लाटांचा आनंद सर्वानी घेतला. आम्ही आठ वाजता रिसॉर्टवर परतलो.   आंबोली घाट- घाटातील वेडीवाकडी वळणे, खड्डे, काहीठिकाणी कच्चे रस्ते, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक पाटी पाहत, मुसळधार पाऊस, पाऊसामुळे ढग धूसर वातावरण, घाटातील पुढे जाण्याची वाहनांची घाईगर्दी, गुगल मैत्रीणीचे ऐकत, हे सर्व सांभाळत आमच्या गाडीचे सारथ्य नितीनने उत्तम  केले. नितिनचे driving BEST..👌👍नितीनच्या वाहन चालवणे याचे विशेष कौतुक आणि अभिमान वाटला. त्याच्यामुळे आंबोली- वेंगुर्ल समुद्र किनारा सफर उत्तम आणि सुखदायी झाली.     


डार्क फॉरेस्ट रिसॉर्ट हे निसर्गाच्या खुशीत वसले असून - अत्यंत शांत आणि रमणीय परिसर- राहण्याची आणि भोजनाची, पोहण्यासाठी तलाव, प्रत्येक खोलीसमोर प्रशस्त हवेत बसण्यासाठी जागा आणि इतर सोयी उत्तम होत्या.  विशेष म्हणजे संध्याकाळी डास आमच्या भेटीस आले नव्हते.  साऱ्या मित्र मैत्रिणींनी वेळ पाळत, संगीत मैफिलीत आणि गप्पाटप्पा, फिरणे..निसर्गाच्या सानिध्यात मनापासून सहभाग घेऊन स्नेह संमेलनात आनंद घेतला.  परत असेच पुढे भेटत राहू असे एकमेकास सांगून जड अंतःकरणे निरोप घेतला. हे स्नेह संमेलन उत्तम पार पाडण्यात ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष/अप्रत्यक्षरित्या हातभार लावला त्यांचे आणि सर्वांचे मनापासून आभार आणि धन्यवाद... 🙏फिर मिलेंगे.... शेखर 🙏

























Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा