मी काय वाचले - १० - समजून घेऊ या मनाला - ले. सुमेधा काळे
मी काय वाचले - १०
समजून घेऊ या मनाला - ले. सुमेधा काळे
हे पुस्तक म्हणजे - डॉ.श्रीरंग बखले - "Interesting insights into the mind " या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद. या पुस्तकात माणसाच्या जीवनात येणारे प्रसंग, घडण्याऱ्या घटना, समस्या, .. यामध्ये होणारा मनाचा गोंधळ .. याचा उहापोह केला आहे. मनाचे आरोग्यकडे आपण दुर्लक्ष करतो. मनाची काळजी कशी घ्यावी. आनंदी वृत्ती, शांतपणा, भावनाप्रधानता कमी करणे, भावनांना शांत करणे, ध्यान - मनात शांती निर्माण करून नकारत्मक भावना शांत करते, आपली प्रगती करून आपले जीवन सुधारणे याबाबत मार्गदर्शन केले आहे. मनाचे चॅनेल - राग, आनंद, भीती, दुःख, प्रेम, उत्साह, भकासपणा याबाबत सुंदर माहिती दिली आहे. मनात चॅनेल बदलून प्रेम आणि सहानुभूती चॅनेल सुरु करावे. छोटे छोटे लेख चांगले आहेत. पुस्तक वाचनीय आहे.






Comments
Post a Comment