"तुमच्या मेंदूचे स्वास्थ तुमच्या हातात "
९ डिसेंबर २०२३ रोजी "तुमच्या मेंदूचे स्वास्थ तुमच्या हातात " - या विषयावर मुग्धा शाह यांचे भाषण कर्नल्स क्यूब संस्थेने आयोजित केले होते. आपले हस्ताक्षर आणि मेंदूचा संबंध आणि ग्रॅफालॉजी याबाबत प्राथमिक माहिती दिली. हातानी लिहिणे यामध्ये स्पर्श, डोळे, मन, जीभ, कान या सर्वांचा वापर होतो. तुमच्या भावना तुम्ही कागदावर लिहून व्यक्त झाल्यावर तुमचा स्ट्रेस कमी होतो.
एखादी गोष्ट आपण जर वापरली नाहीतर ती नाश पावते. एखादा निर्णय घ्यावयाचा असेल तर त्याचे फायदे तोटे कागदावर लिहून काढावेत.. अश्यामुळे मेंदूकडून इतर पर्याय सुचून आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. लिहिण्याच्या सवय होण्यासाठी काही फॉर्मशन्स बाबत माहिती दिली. सकाळी आणि रात्री या फॉर्मशन्समधील कोणतेही फॉर्मशन्स सवय लावून घ्या. स्टार, ब्रॅकेट, टेम्पल, अँगल आणि curve ओशन आणि इतर फॉर्मशन्स बाबत फळ्यावर आकृती काढून प्रत्येक फॉर्मशन्स मुळे शरीरात आणि मेंदूत होणारे बदल आणि फायदे.. हे सांगितले. आपल्या सवयी बदलून इतर गोष्टीचा वापर जरूर करा - उदा. आपण जर उजवे असाल तर डाव्या हातानी लिहिणे, फिरणे वेळी दोन तीन रस्त्यावरून चालणे, घरातील फर्निचरची जागा बदलणे, निसर्गातील पक्षी निरीक्षण करणे, नेहमी नवनवीन बाबी शिका.. भाषा शिकणे, कला ...यामुळे आपला मेंदू नेहमी तल्लख राहून शरीरास योग्य ऊर्जा लाभते, स्मरणशक्ती वाढते, काळजी आणि स्ट्रेस कमी होतो.
कार्यक्रमादरम्यान श्रोत्यांनी कागदावर टिप्पणी आणि आकृती याची नोंद करून घेतली. मुग्धा शाह यांनी श्रोत्यांच्या शंकेचे निरसन केले. काही श्रोत्यांनी आपले लिखाण दाखवले आणि त्यावरून त्यांच्या स्वभावाचे पैलू आणि वैशिष्ट्ये सांगितली. हस्ताक्षर आणि लिखाणाच्या पद्धती आणि त्याबाबत सामान्य ठोकताळे माहिती सांगून आपला मोबाईल नंबर वर आपल्या प्रतिक्रिया आणि बदल याबाबत कळवण्यास सांगितले. कार्यक्रमास मोठा प्रतिसाद होता आणि सर्वांचा सहभाग कौतुकास्पद होता. कर्नल्स क्यूब संस्थेचे आभार आणि मनापासून धन्यवाद.. शेवटी रामदास स्वामी यांनी म्हटले आहेच .. दिसामाजी काहीतरी लिहावे .. हेच खरे नाही का ..
चंद्रशेखर मधुकर कुलकर्णी



Comments
Post a Comment