"पसायदान " - डॉ.सौ. आरती दातार

 








९ डिसेंबर आणि ११ डिसेंबर रोजी स्वस्तिक सभागृह येथे डॉ.सौ. आरती दातार यांचे "पसायदान " विषयावर प्रवचन आयोजित केले होते.  पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी "ज्ञानेश्वरी " लिहिली.  मंदिरात खांब असतात.पण खांबाचे मंदिर झाले आहे. ज्ञानेश्वरीत - कर्म, भक्ती, ज्ञान आहे.  "पसायदान" हे ज्ञानेश्वरीचा कळस आहे. पसायदानच्या ९ ओव्या म्हणजे ९ भक्तीच्या पायऱ्या आहेत, ९ रत्नहार पांडुरंगांनी ज्ञानेश्वराच्या गळ्यात घातला आहे. ओव्याचा भावार्थ समजणे महत्वाचे. जीवनाचा खरा अर्थ कळायला लागतो. जीवन आनंदी बनते. स्वतःची ओळख हे अत्यंत कठीण. स्वतःची ओळख होण्यासाठी अंतरंगात डोकावणे. निस्वार्थ बुद्धी, नम्रता, सेवाभाव,तडजोड वृत्ती, प्रेम .. हे गुण वाढवून मनाची श्रीमंती हवी. माणुसकी देवत्व जाणावे. पसायदान हे ९००० ओव्याचे सार आहे. पसाय म्हणजे प्रसाद.. एक तीळ सात जणांना वाटावा... पसायदान हे मनाचे ब्युटी पार्लर आहे. जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी द्यावे...ज्ञान म्हणजे आत्मज्ञान..आत्म्याला जाग आणणारे आहे.


प्रास्ताविकानंतर ताईंनी प्रत्येक ओवीचा भावार्थ उदाहरण देऊन सांगितला. माणसाने वर्तमान काळात जगावे, कार्याची समाप्ती म्हणून शिष्याचा आनंद - मनाची समाधान - आनंदाने विश्वात्मक देवास - आपल्या गुरूंना विनवणी.. प्रेयसाकडून श्रेयसाकडे जाणे हवे.  शाश्वत सुखाचा ध्यास हवा. सत्कर्माची आवड, परिवर्तन हवे.  भगवंतावर प्रेम करा. भक्तीच्या ९ पायऱ्यांत नामस्मरण सोपे. स्वतःचा धर्म म्हणजे कर्तव्य निस्वार्थीपणाने करावे.  माणसाला देव हवा असे वाटायला पाहिजे. देवाचे नित्य स्मरण हे संपत्ती आणि विस्मरण - विपत्ती. प्रपंच करायचा पण प्रपंचाचा परमार्थ करायचा.  देवत्व फुलवायचे.  चिंता संपली की चिंतन सुरु होते. सुख अंतरंगात आहे बाहेर नाही.  भगवंताची आठवण आणि अखंड भजन पूजन नामस्मरण करा. ताईंनी संजीवन समाधी वर्णन बाबत  स्वतःचे लेखनाचे अभिवाचन केले. खूप मनास भावून गेले.  साऱ्या श्रोत्यानी सामूहिक पसायदान प्रार्थना पठणानंतर प्रवचनाची सांगता झाली.  प्रवचन श्रवणीय होते. श्रोतृवर्ग तल्लीन झाले होते. जे जे आपणाशी ठावे.. म्हणून वाटत आहे.





Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा