शेगाव ट्रिप

 



६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी नागपूर एक्सप्रेस गाडीने आम्ही शेगाव यात्रेसाठी आम्ही भावंडे आपल्या कुटुंबियांसमवेत प्रयाण केले. सोमवारी सकाळी भक्त निवास येथे पहाटे पोचलो. दोन तासानंतर भक्त निवास येथे खोल्या मिळाल्या. आपले स्नान आवरून आम्ही श्री गजानन महाराज समाधी मंदिर येथे समाधीचे दर्शन घेतले. श्री राम मंदिर, आवारातून प्रदक्षिणा, पारायण मंदिर, येथे भेट दिली. मंदिरातील दर्शन रांग, पादत्राण सेवा, प्रसाधन, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छता, महाप्रसाद, देणगी विभाग, या सर्वांचे उत्तम नियोजन मंदिर संस्थान यांनी  केले आहे.


दर्शनानंतर आम्ही मंदिर आसपास - श्री गजानन महाराज चरित्रातील प्रसंगाची स्थळे पाहून आलो.  यात पाटील मळा - ज्याठिकाणी जळत्या पलंगावर महाराज बसले होते. श्री शंकर मंदिर (येथे घोड्यास शांत केले), श्री हनुमान मंदिर (येथे पाटलाच्या मुलांनी महाराजांना ऊसानी मारले.. पण एकही अंगावर वळ उठला नव्हता), श्री गजानन महाराज यांचे प्रकट स्थान - श्री बंकटनिवास,  ही ठिकाणे पाहिली.  दुपारी आनंद सागर या भागास भेट दिली.  येथील अध्यात्मिक केंद्र, साक्षी गणपती मंदिर, श्री शिव मंदिर, संत मंदिर, या भागास भेट दिली.. काही भाग बंद  आहे.


दुसरे दिवशी सकाळी श्री महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आम्ही नागझरी येथे गेलो.  येथे श्री गजानन महाराज यांचे गुरु श्री गोमाजी महाराज यांचे समाधी मंदिर आहे. बाजूस श्री गौरी कुंड, शिवालय मंदिर आहे. नागझरी हुन श्री सिद्धपीठ - श्री महालक्ष्मी मंदिर पाहीले.  येथे श्री नृसिंह लक्ष्मी ची मूर्ती जमिनीत सापडले.  मूर्तीचा एक भाग विष्णू आणि दुसरा भाग लक्ष्मीचा आहे.  हेच मूर्तीचे वैशिष्ट्य.  बाजूस ध्यान मंदिर, लहान मुलांसाठी बाग - झोपाळा घसरगुंडी -- आणि इतर फोटो काढण्यासाठी प्रतिकृती आहेत.  सर्वानी लहान होऊन झोपाळा आणि इतर सोयींचा आनंद लुटला.  


भक्त निवासातील राहण्याची, जेवणखाण, बस व्यवस्था, इमारतीतील सुखसोयी, आवार, स्वच्छता. सर्व अतिउत्तम  आणि माफक दरात उपलब्ध आहेत. श्री गजानन महाराज संस्थान यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद. ९ ऑगस्ट रोजी पहाटे पुण्यास सुखरूप पोचलो  आमच्या ट्रिपचे नियोजन आणि संयोजन श्रेयसने केले होते. त्याच्या कामगिरीबाबत कौतुक वाटले.  काही गैरसोय झाल्यास क्षमस्व.. श्री गजानन महाराजांच्या कृपेमुळे आमची ट्रिप  मजेत आणि आनंदात पार पडली. गण गण गणात बोते.. जय गजानन..श्री गजानन महाराज की जय...

Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा