दिल्ली हरिद्वार ऋषिकेश प्रवास
आम्ही दिल्ली प्रवासासाठी पुण्यातून प्रगती एक्सप्रेस गाडीने CST मुबईस प्रयाण केले. दुपारी ४ वाजता राजधानी एक्सप्रेस गाडीने दिल्लीस जायचे होते. सर्वेप्रथम राजधानी मध्ये प्रथमच प्रवास म्हणून थोडं उत्सुकता होती. राजधानी म्हणजे शताब्दी, वंदे भारत या गाड्यांचं सुधारित गाडी... राजधानीमध्ये चहा पान, रात्रीचे जेवण, ice cream ,झोपण्यासाठी ब्लॅंकेट आणि उशी बेडशीट देतात.. या गाडीचा वेग, सेवा यामुळे ही गाडी विशेष ..सकाळी १०.३० वाजता आम्ही हजरत निजामुद्दीन दिल्ली स्टेशनवर सुखरूप पोचलो. दिल्लीमध्ये आम्ही - रामकृष्ण आश्रम, अक्षरधाम मंदिर, नवीन पार्लमेंट इमारत, दिल्ली, मुंबई गेट, लाल किल्ला, जैन मंदिर, जामा मस्जिद, चांदणी चौक या भागास भेटी दिल्या. दिल्लीची मेट्रो ट्रेन उत्तम आहे. काही वेळेस मेट्रोतून प्रवास केला. दिल्लीचे रस्ते रुंद आणि स्वच्छ आहेत.
हरिद्वार येथून ऋषिकेशला जाण्यासाठी टॅक्सी केली. ऋषिकेशला जाताना घाट विभाग आहे. आसपास झाडे आणि जंगल आहे. ऋषिकेशला परमार्थ निकेतन येथे मुक्काम उतरलो होतो. परमार्थ निकेतन हे रिसॉर्ट आहे. येथे राहण्याची (AC ) सोय माफक दरात उत्तम आहे. येथे कॅन्टीनमध्ये नाश्ता, जेवण, खानपान व्यव्यस्था छान आहे. भोजनादी पदार्थ रुचकर आहेत. परिसरात ध्यान मंदिर, ग्लास मंदिर, छोटीशी बाग, आजूबाजूस झाडी (पिंपळ, वड, औदुंबर ही शंभर वर्षांपूर्वीची झाडे) एकूण परिसर सुंदर आणि प्रसन्न आहे. जवळच गंगा नदी वाहत असते. सुंदर घाट आहे. येथे रोज संध्याकाळी गंगा आरती होते. राम झुला, लक्ष्मण झुला, जानकी झुला असे गंगा नदीवर झुलते पूल बांधले आहेत. त्रिवेणी संगम येथे गंगा आरती मोठ्या प्रमाणात करतात ही पाहायला खूप सुंदर आहे. सगळ्या ठिकाणी गंगाचा प्रवाह जोरात असतो. गंगा भव्य आणि दिव्य आहे. हे खरंच अनुभवायला हवे. गंगेच्या नदीकाठी संध्याकाळी पाण्यात पाय सोडून कट्यावर निवांत बसणे म्हणजे जणू स्वर्गसुखच...
ऋषिकेश येथून २५ km वर नीलकंठ मंदिरास भेट दिली. येथील शिव लिंग हे श्री शिवानी स्थापित केले आहे. दर्शनासाठी जवळजवळ दोन तास लागले कारण कावड यात्रा आणि अधिक श्रावण मास यामुळे भक्तांची गर्दी होती. खरंच उत्तराखंड ही देवभूमी आहे. ऋषिकेश अत्यंत रमणीय आणि प्रसन्न ठिकाण आहे. मनास आनंद झाला. ऋषिकेश हुन आम्ही डेहराडून मार्गे पुण्यास परतलो. डेहरापासून विमानतळ खूप छान आहे.
Comments
Post a Comment