कानपुर प्रवास
चि. श्रेयूस, अनेक आशीर्वाद ,
आम्ही जड अंतःकरणाने IIT कानपुर चा निरोप घेऊन लखनौ, दिल्ली मार्गे पुण्यास रात्री १२.२० वाजता सुखरूप पोचलो. सोमवारी सकाळी ८ वाजता मेस मध्ये नास्ता .. चुकल्या चुकल्यासारखे झाले. नास्ता दुपारचे जेवण, संध्याकाळी चहा, रात्रीचे जेवण मेस, कॅन्टीन यांची ८ दिवस सवय झाली होती. प्रत्येकवेळी नवीन मेनू यामुळे आमचे पोटोबापण खुश.. सौ वर्षास तर माहेरपेक्षा अधिक सुखावा लाभला.. आमच्या वास्तव्यात ( उन्हाळ्याच्या दिवसात ) पाऊसाने हजेरी लावून आम्हास थंडावा पण दिला.
IIT कॅम्पस मध्ये होस्टेल्स, कॅन्टीन, मेस, शॉपिंग कॉम्प्लेक्स, लायब्ररी, Lecture हॉल, अकॅडेमिक भाग, इनडोअर स्पोर्ट्स, इतर पटांगण, स्टेशनरी, स्टाफ लोकांचे निवास स्थान, ऑडिटोरियम... या सर्व भागांची भेट घडवून दिलीस. हे सर्व भव्य आणि दिव्य आहेच. तुझ्या लॅबमध्ये तू तुझ्या गाईड सरांची भेट झाली. तुझे सर अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी.. असे व्यक्तिमत्व.. थोड्या गप्पा झाल्या. तुझ्या प्रगतीबाबत सरानी आम्हास सांगितले. To be happy in Life is important माणसास विनम्रता हवी .. हा सरांचा विचार मनास भावून गेला. नंतर चहापानाचा योग आला. भेटीआधी सरांशी (माझे तांत्रिक ज्ञान शून्य) काय बोलावे असा प्रश्न पडला होता. सरानी गप्पा मारून आम्हाला आपलेसे केले. मनास खूप बरे वाटले आणि तुझी प्रगती पाहून समाधान झाले.
सकाळी सायकलवरून कॅम्पस मध्ये फेरफटका मारताना अनेक मोर आणि लांडोर यांच्या भेटी झाल्या. इटुकल्या खारीपण इकडून तिकडून पळत होत्या, कावळे, चिमण्या, कोकिळा, भारद्वाज पक्षी कॅम्पस मध्ये मुक्कामास होते. झाडी आणि हिरवळ फुलांची झाडे, पाहून मन ताजेतवाने झाले. कुत्री पण होती. मेससमोर एक कुत्रा (धष्ट्पुष्ट) नेहमी असायचा. मेस खाणे खाऊन हा कुत्रा IIT मध्ये शोभतो असे मी म्हटले. त्याववर तू गमतीने - हा येथे १५-२० वर्षे - Ph .D करीत आहे. म्हणालास..
आई बाबा आणि आत्या काका आले म्हटल्यावर तुझी मित्रमंडळी आम्हास भेटावयास आली होती. सर्वांची तू ओळख आणि त्यांचे वैशिष्ट आम्हास सांगत होतास. तुझे मित्रमंडळ म्हणजे - नॅशनल इंटेग्रिटी - कोण बिहार, MP , झारखंड, तामिळनाडू. आंध्र. केरळ. कर्नाटक. महाराष्ट्र. UP दिल्ली पंजाब...प्रत्येकवेळी कॅम्पसमध्ये फिरताना बरेच जण हाय - हॅलो करीत होते. हा तुझा मित्र परिवार पाहून आम्हास अत्यंत आनंद झाला. तुझ्या वास्तव्यात मित्र मंडळींची तू ph D पदवी प्राप्त केली आहेस. तुझे विशेष कौतुक वाटले. अर्थात तुझा बोलका स्वभाव आणि इतरांना आपलेसे करणे ही कला तुझ्या आईकडून आली आहे. (मी मात्र मुखदुर्बल - लाजाळू, कमी बोलणारा होतो आणि अजुनी आहे )
कानपुर मुक्कामी आम्हास वाराणसी, गंगा आरती, सारनाथ ,प्रयागराज, बिठूर या ठिकाणी भेट दिली. प्रत्येक ठिकाणी राहण्याची, खानपान, दर्शन, बोटींग, यांचे उत्तम नियोजन आणि आयोजन याबाबत तुझे कौतुक वाटले.जाता येता विमान प्रवास, वंदे भारत रेलप्रवास...याचा आनंद तुझ्यामुळे मिळाला..अर्थात या प्रवासातील सुख आम्हास लाभावे हा तुझा मानस ...जाता येता विमान प्रवास, वंदे भारत रेलप्रवास...याचा आनंद तुझ्यामुळे मिळाला..अर्थात या प्रवासातील सुख आम्हास लाभावे हा तुझा मानस ...हे म्हणजे जणू श्रावणबाळ ...सेवा ..आम्हास धन्य वाटले.. तुझ्या कष्ट आणि मेहनत, सेवा याबाबत तुझे आभार मानावे म्हणून ही पोचपावती.
विनासायास आमचे आरक्षण, सुखकर प्रवास, वाहनांची सोय, खानपान व्यवस्था, मुख्य तब्येत चांगली राहणे, तुझ्या गुरूंची आणि मित्रमंडळांची भेट.. आल्हाददायी वातावरण...हे सर्व परमेश्वरानी आधीच नियोजन करून ठेवले होते काय ...मला वाटते ही सारी पूर्व जन्माची पुण्याई आणि देवाची कृपा . नाही का . हर हर महादेव,, नमामि गंगे.. श्री राम जय राम जय जय राम ...
असो माझे आकाशात उडत असणारे भावनिक शब्दांचे विमानाची लँडिंग वेळ जवळ आली..येथेच थांबतो..जय श्रीराम ..अशीच तुझी सदैव्य भरभराट हो .. उत्तम आरोग्य आणि यश लाभो ..हीच श्री शाकंभरी देवीस प्रार्थना शुभम भवतु
..आई बाबा
Comments
Post a Comment