कानपुर ट्रीप - 26.04.2023 -

 



आम्ही सारनाथ, BHU बिर्ला मंदिर ही ठिकाणे पाहण्यासाठी रिक्षा ठरवली.  प्रथम सारनाथ येथील बुद्ध मंदिर पहिले.  हा परिसर खूप स्वच्छ आणि सुंदर आहे. येथे बुद्ध स्तूप, बोधी वृक्ष आणि घंटा आहे. पहाटे ही घंटा वाजवतात.  याचा आवाज २ km पर्यंत जातो असे सांगतात.  बुद्धाची बोधी वचने दोन्ही बाजूस लावली आहेत. येथे जपानी बुद्ध मंदिर पाहण्याजोगे आहे. जपान सरकारच्या मदतीने हे बांधकाम केले गेले आहे. 


















बनारस हिंदू युनिव्हर्सिटी हा मोठा भाग आहे  याला येथे "लंका" म्हणतात.  बिर्ला मंदिर, IIT BHU , आणि युनिव्हर्सिटीची इतर विभाग सर्व या भागात आहेत.  बिर्ला मंदिर दुमजली आहे. दुसऱ्या मजल्यावर भगवद गीता अध्याय, उपनिषद, वेद यातील श्लोक, ऋचा.. कोरले आहेत.  येथे श्री शिवलिंग, गणपती, राम सीता , मूर्ती आहेत. आसपास बाग आहे.  नंतर आम्ही IIT BHU आणि इतर युनिव्हर्सिटी भाग विभाग बाहेरून पाहिले.  पंडित मदन मोहन मालवीय यांचा पुतळा आहे.





















Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा