कानपुर ट्रीप - 24.04.2023 -IIT कॅम्पस
IIT कॅम्पस मध्ये होस्टेल्स, कॅन्टीन, मेस, शॉपिंग कॉम्प्लेक्स, लायब्ररी, Lecture हॉल, अकॅडेमिक भाग, इनडोअर स्पोर्ट्स, इतर पटांगण, स्टेशनरी, स्टाफ लोकांचे निवास स्थान, ऑडिटोरियम... या सर्व भागांची भेट घडवून दिलीस. हे सर्व भव्य आणि दिव्य आहेच. तुझ्या लॅबमध्ये तू तुझ्या गाईड सरांची भेट झाली. तुझे सर अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी.. असे व्यक्तिमत्व.. थोड्या गप्पा झाल्या. तुझ्या प्रगतीबाबत सरानी आम्हास सांगितले. To be happy in Life is important माणसास विनम्रता हवी .. हा सरांचा विचार मनास भावून गेला. नंतर चहापानाचा योग आला. भेटीआधी सरांशी (माझे तांत्रिक ज्ञान शून्य) काय बोलावे असा प्रश्न पडला होता. सरानी गप्पा मारून आम्हाला आपलेसे केले. मनास खूप बरे वाटले आणि तुझी प्रगती पाहून समाधान झाले.
सकाळी सायकलवरून कॅम्पस मध्ये फेरफटका मारताना अनेक मोर आणि लांडोर यांच्या भेटी झाल्या. इटुकल्या खारीपण इकडून तिकडून पळत होत्या, कावळे, चिमण्या, कोकिळा, भारद्वाज पक्षी कॅम्पस मध्ये मुक्कामास होते. झाडी आणि हिरवळ फुलांची झाडे, पाहून मन ताजेतवाने झाले. कुत्री पण होती. मेससमोर एक कुत्रा (धष्ट्पुष्ट) नेहमी असायचा. मेस खाणे खाऊन हा कुत्रा IIT मध्ये शोभतो असे मी म्हटले. त्याववर तू गमतीने - हा येथे १५-२० वर्षे - Ph .D करीत आहे. म्हणालास..


















Comments
Post a Comment