मी ... येसूवहिनी
कर्नल्स क्यूब यांनी ८ एप्रिल २०२३ रोजी - मी ... येसूवहिनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. समिधा पुणे प्रस्तुत - येसूवाहिनी व स्वातंत्रवीर सावरकर यांच्यातील दीर-भावजयीच्या पवित्र नात्याचे बंध उलघडून दाखविणारा - एक हृद्य सांगीतिक अभिवाचन - कार्यक्रमाची पूर्वपीठिका, कार्यक्रमाबाबत माहिती श्री दिलीप ठोसर यांनी सांगून हा कार्यक्रम -८ एप्रिल ही बंकिमचंद चॅटर्जी यांची पुण्यतिथी -वंदे मातरम या गाण्याचे लेखक श्री बंकिमचंद चॅटर्जी याना अपर्ण करीत आहोत असे नमूद केले.
यशोदा - लग्न झाल्यानंतर माप ओलांडून सावरकर यांच्या घरी आल्यानंतर संसाराची जबाबदारी पेलवणे ते आपल्या मृत्यू पर्यंतचा प्रवास... सादर केला गेला. सासरी लक्ष्मीने पाय काढला पण सरस्वतीची उपासना निर्धार करीत सावरकरांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आपल्या आईने दिलेला मौल्यवान दागिना - नथ विकला. तात्यारावांनी येसूवहिनीना शिक्षणाचे धडे दिले. केसरी, काळ वर्तमानपत्रातील लेख वाचून दाखवले.
लहान वयात - ज्ञानेश्वर आणि शिवबा यांचे आदर्श घरी होते. चाफेकर यांचा वारसा पुढे चालवण्याचे आणि देशस्वातंत्त्र चे स्वप्न बाळगून "अभिनव भारत" ही संघटना स्थापन करून परदेशी मालाची होळी पुण्यात केली. आपल्या कुटुंबियांचे ध्येय बघता येसूवहिनी यांनी १५ - १६ व्या वर्षी देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याचा निर्धार करून महिलांना स्वातंत्र,शिक्षण - क्रांती, स्वदेशी प्रचार बाबत काम केले. बॅरिस्टर शिक्षणासाठी इंग्लंड येथे गेले असताना अनेक अडीअडचणींना तोंड देत येसूवहिनींनी सावरकर कुटुंब सावरले. आपल्या मातेसमान असलेल्या येसूवाहिनी यांच्या कामाचा अभिमान सावरकर याना होताच. त्यांनी इंग्लंड हुन पत्रातून " सांत्वन" या कविता केल्यानंतर येशुवहिनींचे काळजाचे पाणी झाले.
सागराशी संवाद साधताना सुचलेले गीत -सागरा प्राण तळमळा - हे हृदयस्पर्शी गीत ऐकताना रसिक श्रोत्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या गेल्या... काळजाचे पाणी होणे... हे मी अनुभवले. काळ्यापाण्याची शिक्षा, अंदमान तुरुंगातील आठवणी आणि अनेक कविता .. हे सर्व भोगत असताना सुचलेले काव्य .. वहिनींनी स्वाभिमान बाळगून केलेला त्याग, शोशिकपणा, मनाचा खंबीरपणा, देशप्रेम, दिराविषयी पवित्र ममत्व, या आणि अधिक अंगी वसलेल्या गुणांच्या - येसूवहिनी यांचे कौतुक करण्याबाबत खरच शब्दच कमी पडतात..
या कार्यक्रमाची संकल्पना, गीतवाचन - संगीता ठोसर, संहिता लेखन - डॉ. चित्रलेखा पुरंदरे, अभिवाचन - वीणा गोखले, विनोद पावशे, सूत्रधार -दिलीप ठोसर .. सर्वानी आपापली भूमिका उत्तम सादर केली. या ९० मिनटांचा हृदयस्पर्शी कार्यक्रम ऐकण्यासाठी सावरकरप्रेमी रसिकांनी हजेरी लावून उत्तम दाद दिली. देश्प्रेमासाठी धैर्य ,त्याग आणि मातुतुल्य असणाऱ्या सतीसावित्रीसारख्या येसूवहिनीच्या कार्याची महती ऐकून साऱ्या श्रोत्यांचे मन हेलावून गेले आणि कार्यक्रम झाल्यावर घरी परतताना..कृतज्ञतेने पाऊल जड झाले. हा उत्तम कार्यक्रम इतरांनी जरूर पाहावा.. या हृदयस्पर्शी कार्यक्रमाबाबत कर्नल्स क्यूब संस्थेचे परत मनापासून आभार आणि धन्यवाद ...


Comments
Post a Comment