अष्टविनायक प्रवास
11 फेब्रुवारी शनिवारी सकाळी थेऊर कडे गाडीने प्रयाण करीत अष्टविनायक प्रवासाचा श्रीगणेशा केला. थेऊर चिंतामणी गणपती दर्शन घेतले. आमची अष्टविनायक सहल सुखरूप पार पडू दे ही मनातील चिंता व्यक्त केली आणि मनोमनी प्रार्थना केली. मोरगांव गणपती जाताना वाटेत नाष्टा शिवनेरी मिसळ वर ताव मारला. मोरगांव येथे मोरेश्वर गणेशाचे दर्शन घेऊन पुढे सिद्धटेक कडे वाटचाल केली. सिध्दटेक सिद्धिविनायक मंदिर खूप छान प्रशस्त आणि प्रदक्षिणा आवर मोठा आहे. रांजणगाव मार्गात दुपारी जेवण झाल्यावर चार वाजता रांजणगाव येथील महागणपती दर्शन घेतले. नजीकच्या बागेत वाघ सिंह यांच्या समवेत ग्रूपफोटो काढले. फोटोवेळी सगळे प्राणीच घाबरलेले दिसले. ओझर येथे आम्ही संध्याकाळी 7.30 दरम्यान पोचलो. शनिवार असल्याने बरेच भक्त जमल्यामुळे भक्त निवासमध्ये रूम मिळाली नाही. मंदिराजवळ एक लॉज मिळाले. मंदिरात विघ्नेश्वर गणपतीचे दर्शन घेऊन प्रसाद लाभ घेऊन विश्रांती घेतली.
रविवारी सकाळी सहा वाजता लेण्याद्री कडे गाडीने प्रयाण केले आणि मंदिरांच्या पायथ्याशी पोचलो. गेट सकाळी 7वाजता उघडते.गेट नेहमी ८ वाजता उघडते. ७ ते ८ वेळेत दर्शन मोफत असते. ८ नंतर दर्शनासाठी रु. २५ द्यावे लागतात. म्हणून सकाळी ७ दरम्यान भक्तांची बरीच गर्दी होती. येथे जवळ जवळ 300 पायऱ्या चढून वर जावे लागते. ही खरी आपल्या पायाची परीक्षा... मंदिराजवळ भक्तांच्या दर्शनासाठी बरीच वानर सेना आली होती. हातातील पाण्याच्या बाटल्या आणि इतर खाद्य पदार्थ पळवणे, डोक्यावर चढून ओढणी ओढणे या माकड लीला पाहीले. सर्वांना प्रथम दर्शन घ्यायचे यामुळें गर्दी.. नियंत्रण कोलमडले.. गुफेमध्ये गिरिजात्मक गणेशाचे दर्शन घेतले. 8 वाजता सुखरूप पोचून नाष्टा करून महड कडे प्रयाण.. आम्हा ज्युनिअर सिटिझन (50 चे पुढे) सगळे परीक्षेत उत्तम मार्कनी पास झालो. अर्थात ही सारी गणपतीची कृपा... महड कडे गाडीने जाताना शिवनेरी किल्ला लागतो. जय शिवाजी.. शिवरायांचा पुतळा दर्शन होते. आम्ही साधारपणे 12.30वाजता महड येथे पोचलो. दर्शनासाठी बरीच गर्दी होती. वरद विनायक गणपती बाप्पा दर्शन..मागे श्री दत्त मंदिर यांचे दर्शन घेऊन भोजनासाठी हॉटेल कडे गेलो.. पोटात कावळे ओरडत होते... ऑर्डर देऊन पुढे अर्धा तासाने थाळी तीन वाजता आपल्यासमोर आली.. जेवण छान होते.(अर्थात भुकेच्या वेळी सर्व गोड लागते नाही का....) आम्ही शेवटच्या गणपती पाली कडे प्रयाण केले. प्रवास घाट, निसर्ग सौंदर्य अनुभवले. संध्याकाळी पाच वाजता मंदिरात श्री बल्लळेश्वर गणपती दर्शन घेतले. मंदीर बरेच पुरातन कालीन आहे. रांगव्यवस्था उत्तम आहे. इती अष्टविनायक यात्रा समाप्त...
डिसेंबर महिन्यात या यात्रेचा संकल्प सौ. वृंदाताई केला होता. प्रवासात प्रत्येक गणपती बाबत थोडक्यात माहिती वाचन सौ. मेधाताई, प्रवासात अनेक ठिकाणी उत्तम फोटो प्रदीपअण्णा यानी काढले.. गाडीचे नियोजन सुहासअण्णा.. प्रवासात साऱ्या भक्तांचा उत्तम प्रतिसाद आणि आनंद यामुळें 2023चा पहिला प्रवास सुखकर आनंदात पार पडला.. ही सारी गणपतीची कृपा... गणपती बाप्पा मोरया.. मंगल मूर्ती मोरया..संबंध प्रवासात श्री जगदीश खेबुडकर यांचे अजरामर गीत - अष्टविनायका तुझा महिमा कसा .. दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी जसा .. हे गाणे मनात गुंजारव करीत होते....या यात्रेचा लाभ आपणास वाटावा म्हणून हे लिखाण ...





















Very good. यथार्थ वर्णन.
ReplyDelete