अनिल भाटे - एक कौटुंबिक मित्र

 


आज अनिल भाटे याचा निवृत्तीदिन्याच्यानिमित्य आपण शुभेच्छा देण्यासाठी आपण जमलो आहोत.  अनिल हा माझ्या मोठा भाऊ सुहास याचा ऑफिस सहकारी मित्र.  बँकेत नोकरीनिमित्त पुण्यात आलो असताना १९८५ साली आमची ओळख झाली. सांगवी येथे राहत असताना आमचा ५-६ मित्रांचा ग्रुप जमला होता. डेक्कन जिमखाना येथील "लकी " या हॉटेलमध्ये आम्ही अधूनमधून संध्याकाळी ६ वाजता एकत्र जमत असू. चहा पे चर्चा/गप्पा घडत.  मेहेंदळे गॅरेज येथे तो राहत असे.  शनिवार/रविवार आम्ही खानावळीचा एकत्र डब्बे, चहा भाजी/क्रीमरोल, सिनेमा असा कार्यक्रम असायचा.  एकदा सांगवी ते मेहंदळे गॅरेज चालत गेलो होतो. त्याच्या खोलीत आम्ही  TV वर बजेट, टेनिस/फुटबॉल मॅचेस पाहत असू.  शेयर्स गुंतवणूक वर चर्चा घडे. आंब्याचा मोसमात  एक पेटी आंबे आणून आमरस कार्यक्रम असे. नोकरीत नव्याने रुजू झाल्यावर - ऑफिसला जाताना दररोज दाढी कर, इनशर्ट,बेल्ट,बूट आणि बुटाला पोलिश ..वगैरे सल्ला मला देत असे..

आमच्या घरगुती कार्यक्रमात हजर राहून मनापासून सर्व कार्यात मदत करीत असे. आम्ही सात भावंडे - प्रत्येकाच्या विवाह सोहळ्यात अनिलचा सक्रिय सहभाग असायचा. आमची आई त्याला ८ वा मुलगाच मानायची.  आमच्या संबंध खानदानात सर्वाना अनिलची ओळख  व्यक्तिशः आहेच "लकी " मध्ये गाठभेट झाली आणि त्याची  मोठ्या भावाप्रमाणे साथसंगत लाभली याबाबत मी खरंच "लकी" काय ऋणानुबंध असतात देव जाणे ..कधीकधी आमच्या  देशस्थीपणावर टीका टिप्पणी करे.. अधे - मध्ये हे काय तंगड्यात तांगडे असे मला गमतीने म्हणत असे.

टापटीपपणा, वक्तशीरपणा, स्पष्टवक्तेपणा,दुसर्यांना वेळोवेळी मदत करणे.दुसऱ्याचे कौतुक करणे .करोना लाटेत इतरांना हॉस्पिटल मध्ये चौकशी करून ऍडमिट करणे आणि करोनग्रस्त कुटुंबीयांची आस्थेने  विचारपूस करणे ही समाजसेवा आनंदाने केली..हे गुण मला अधिक भावले. 

२०२१ सालच्या शेवटच्या आठवड्यात त्याच्या वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, आणि ऑफिसमधून निवृत्ती हे म्हणजे जणू आनंदाचा त्रिवेणी संगमच...या आनंदाच्या सोहळयात आम्हाला हजर राहता आले आम्ही भाग्यवान...आपल्या जीवनसाथी समवेत उत्तम संसार करून मुलांची शिक्षण, नोकरी आणि लग्न कार्य जबाबदारीने पार पाडली आहेत.आपल्या सासूसासरे यांची मनोभावे सेवा करतो  त्याचे भावी जीवन सुख समाधान, आनंदमयी आणि आरोग्यदायी राहो..हीच देवाकडे प्रार्थना.. निवृत्तीनंतर त्याच्याकडून अधिक समाज सेवा घडो हीच सदिच्छा...शुभम भवतु.. जीवेत शरद शतं...नव्या वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा...श्री राम जय राम जय जय राम 

Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा