सासुरवाडी नातलगांचे संमेलन
आमच्या सासुरवाडी नातलगांचे संमेलन "Gubbi Goodu" रिसॉर्ट बंगलोर येथे 11 डिसेंबर ते 13 डिसेंबर रोजी आयोजित केले होते. शनिवारी रिसॉर्ट येथे आगमन वेळी आमचे औक्षण केले गेले. सर्वाना "Family Fun " याचे T - शर्ट आणि कॅप यांचे वाटप झाले. दुपारी संगीत खुर्ची, संध्याकाळी क्रिकेट खेळ, कॅरम, टेबलं टेनिस, संध्याकाळी कॅम्प फायर यावेळी सर्व मंडळींना आवडते गाणे, विवाहित स्त्रियांना आपल्या पतीचे थोडक्या शब्दात वर्णन, करावके गाणी कार्यक्रम झाला.
रविवारी सकाळी Hat game - समोरासमोर उभे राहून आपल्या साथीदाराची टोपी दुसऱ्या साथीदाराने काढून तिसऱ्याच्या डोक्यावर घालणे. music बंद झाले असताना ज्याच्या कडे टोपी असेल ते दोघेही बाद. या खेळात खूप मजा आली. गाण्याच्यावेळी नाच..पोहणे आणि रेन डान्स याचा आनंद घेतला. संध्याकाळी प्रत्येक आजी आजोबानी डोळ्यावर पट्टी बांधून आपापल्या नातवंडांना हाताच्या स्पर्शाने ओळखणे, पासिंग द बलून या खेळात बलून मध्ये आलेल्या चिट्ठीच्या प्रश्नांचे उत्तर देणे. हा खेळ खूपच छान झाला प्रश्न मजेशीर होते. लहान मुलांच्यासाठी डान्स आणि statue -- संगीत बंद झाल्यावर statue सारखे उभे राहणे.कुटुंबातील प्रत्येकास प्रशस्तीपत्रक देण्यात आले. प्रत्येकाचे विशेष गुणांबाबत हा पुरस्कार होता. नंतर या पुरस्काराबाबत आणि संमेलनाबाबत आपापले मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली गेली. नंतर परत गाण्याचा कार्यक्रम झाला.सोमवारी सकाळी चि. ओजसचा वाढदिवस - केक कापून जोरात साजरा केला गेला. सर्वानी त्याला आशीर्वाद दिले. नास्ता झाल्यावर सर्वानी राम राम केला.
रिसॉर्ट येथील भोजनाचे विविध खाद्य पदार्थ, उत्तम राहण्याची, खेळाची सोय आणि इतर सेवा उत्तम होती. आजूबाजूला निसर्गाची साथ, हिरवळ, पक्षी, झोपाळे, बसण्यास बाके, फुलझाडे . . बोधी वृक्ष बाग... यांनी रिसॉर्टची शोभा अधिक उठून दिसते. कार्यक्रमास 7 कुटुंबातील 34 जणांनी हजेरी लावून आनंद लुटला. यामध्ये किमान दोन वर्ष ते कमाल ८५ वयोगटातील सभासद (पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या जनरेशन ) यांचा समावेश होता. आजकाल एकत्र सर्व नातलगांची भेट घडणे ही एक पर्वणीच नव्हे का ..? या कार्यक्रमाचे आयोजक यांचे आभार मानून परत असेच संमेलन करूया या निर्धारानं जड अंतकारणांनी निरोप घेतला.
या कार्यक्रमास मला हजेरी लावता येते की नाही याबाबत मी साशंक होतो. ८ दिवस रजा मंजूर होते की नाही या कारणामुळे. कार्यक्रमाच्या चार दिवसापूर्वीच मला रजा मंजूर झाली. मनाला आनंद मिळाला. आनंदी आनंद गडे.... कार्यक्रमादरम्यान दोन दिवस मला ती. अप्पाजी (माझे सासरेबुवा - वय ८५ ) यांची थोडी सेवा करण्याची संधी लाभली. मला "Best Writer Award " मिळाला. मला रजा मिळणे, सेवा करण्याची संधी, पुरस्कार,... या त्रिवेणी संगम लाभणे हे सर्व परमेश्वराची योजना असेल नाही का ...? मी याबाबतीत देवाचा अत्यंत ऋणी आहे...कुटुंबातील सर्वाकडून मला लाभलेले प्रेम आणि आपुलकी याबाबत कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून हे मनोगताचे पुष्प मनोभावे सादर.. सर्वाना आपल्या कौटुंबिक जीवनात शांती आणि सुआरोग्य लाभो हीच देवाकडे प्रार्थना ... मनापासून नमस्कार आणि धन्यवाद...श्री राम जय राम जय जय राम ...
कित्ती छान. तुम्हा लोकांकडे इनोव्हेटिव्ह आयडिया ज असतात. असेच आनंदी रहात जा. कारण शेवटी तो आपल्यावरच अवलंबून असतो. ऑल दी बेस्ट.
ReplyDelete