शिवानीस MD अभ्यासक्रमासाठी शुभेच्छा ..
चि. शिवानीस,
तुला उदयपूर (राजस्थान) येथे MDS साठी (Master in Dental Surgery ) प्रवेश मिळाला. हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा 💐💐 ही कौतुकास्पद आणि अभिमानाची बाब आहे. उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळणे आणि संधी मिळणे हे भाग्यच...आपल्या आजी-आजोबा यांची पुण्याई, आई- वडील, नातलग यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा... आता नवीन प्रांत, नवीन हॉस्टेल वातावरण, अभ्यासक्रम. जीवनक्रम .. यामुळे तुला थोडी उत्सुकता, काळजी वाटत असेल..साहजिक आहे म्हणा. नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचे शहाणपण माणूस आपोआप शिकतोच..तुलापण हे सगळे व्यव्यस्थित जमेलच.. तू हुशार स्मार्ट आहेस...नेहमी आपल्या सदविवेकबुद्धीला पटेल तोच निर्णय घे. आपल्या व्यस्त जीवनात आपले आरोग्य (मानसिक आणि शारीरिक) महत्वाचे. अर्थात तू डॉक्टर असल्यामुळे आरोग्याचे महत्व अधिक सांगायला नको. तुला स्वतःचे आणि समाजाचे आरोग्य राखावयाचे आहे. तुझ्या क्षेत्रातील माहिती ज्ञान कष्ट करून संपादन कर. व्हॉट्सअँप, मोबाईल पेक्षा ग्रंथवाचन यावर जास्त भर दे. तू परिश्रम घेऊन नक्की यशस्वी MD होणार यात शंका नाही. तुला शिक्षणात भरपूर यश मिळून प्रगती हो.. हीच श्री गजाननास प्रार्थना..
तुझ्या आई वडिलांची काळजी करू नकोस. काळजी घेण्यासाठी आम्ही शेजारी आहोतच. तुझ्या भावी वाटचालीत देव तुझ्या पाठीशी असू दे तुझे जीवन सुखासमाधानाचे आरोग्यमयी, आणि आनंदमयी राहो हीच दिपावली निमित्त शुभकामनाची शब्दाची छोटीशी पणती सप्रेम भेट. जग सुंदरच आहे.. बक अप शिवानी सुंदर..Go ahead ...शुभास्ते पंथानः शिवानी .. God bless you ..🙏
चंद्रशेखर मधुकर कुलकर्णी - E -३०२ सिल्व्हरक्रेस्ट हौसिंग सोसायटी
Comments
Post a Comment