सेवाभावी डायनॅमिक डांगी
परवा आपणाशी फोनवर संवाद झाला. बातचीत दरम्यान आपण आपल्याकडे आईवडील आल्याचे सांगितले. आपले आईवडील यांनी ९० पार केली आणि सध्या हांथरुणावर खिळून आहेत. जेवण खाण्यासाठी उठून बसतात बाकी सर्व गोष्टी बेडवरच .. कॅथेटर्स, आजारपण, शुश्रूषा, खानपान सेवा.. याबाबत सांगितले. हे ऐकून माझ्या डोळ्यासमोर आपल्या घरचे चित्र साकारले गेले. थोडी काळजी वाटली. पण आपली "डायनॅमिक डांगी " सारे काही व्यवस्थित आनंदाने पार पाडत असणार याबाबत शंका नाही. " CM ऑफिसमधील अगर घरचे काम असो ते नेहमी आनंदाने पार पडायचे .. रडत कुडतपणे करायाचे नाही त्यात मजा नाही." बँकेत काम करताना आपले हे शब्द मला आठवतात. ३० वर्षांपूर्वी बँकेत असताना आपल्या व्यवस्थित कामाबाबत मी जवळून पाहिले आहे. मी आपला स्टॅमिना, प्रत्येक काम आनंदाने व्यवस्थित करणे आणि नेहमी हसत खेळत राहणे हे मी जवळून अनुभवले आहे. खरंच नशीबवान समजतो.
आजकाल 90 वर्षाचे आपले आईवडील असणे यांची आपल्या घरी सेवा करायला मिळणे , याकामी आपल्या पतिदेवाची साथ असणे .. याबाबत आपण खरंच भाग्यवान...याकामी घरची गृहिणीच्या त्यागाचे, सेवेचे कौतुक करावे तितके कमीच... परिस्थितीशी धैर्याने आनंदने सामोरे जाणे म्हणजे हे एक प्रकारे जणू युद्धच असते नाही का ... महाभारतात युद्ध किमान संध्याकाळी सूर्यास्त वेळी समाप्त व्हावयाचे. पण याठिकाणी 24 x 7 - कोणत्यावेळी काय परिस्थिती असेल देव जाणे...घरची गृहिणीचे मनोबल आणि मनाचा मोठेपणा खूप महत्वाचा.. नाही का ...? पुरुष एक वेळ बाहेरची कामे यामुळे रणांगणातून थोडा आराम घेऊ शकतो. पण गृहिणीला विश्रांती नाहीच...खरे ना..आपण दोघे एक पुण्याचे काम करत आहेत..या सत्कर्मात आपणा दोघांना भरपूर शारीरिक आणि मानसिक शक्ती लाभो हीच श्री शांतादुर्गा देवीस प्रार्थना ...
आपल्या माता पित्यांना आम्हाला भेटायला यावे असे मनापासून वाटत होते. पण " आपको सतर्क कराना चाहते है अभिताक करोना खत्म नही हुवा है " असे आम्ही दररोज आकाशवाणीवर ऐकतो. सद्य परिस्थिती आणि वय यामुळे आम्ही येथूनच आपल्या आदरणीय आई-वडिलांना मनापासून नमस्कार करतो.. हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे ..सर्वाना सुखात आनंदात ठेव.. सर्वांचे भले कर कल्याण कर आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहू दे ...श्री राम जय राम जय जय राम ...
Comments
Post a Comment