मी काय वाचले - 12
विश्वास ग्रंथालयातून "रुजवाई" - ले. प्रतिमा कुलकर्णी यांचे पुस्तक वाचले. हा एक कथासंग्रह आहे. कथेमध्ये नातिचरामी, रुजवाई, कायापालट, शुष्का, ऋणानुबंध, मंगळसूत्र, स्वयंसिध्दा, नकुशी, रांगोळी .. या कथा आवडल्या. या कथा संग्रहात मानवी भावभावनांचा वेध घेतला आहे. आपल्या मनोगतात लेखिका म्हणते - या कथेत वयाच्या प्रत्येक वळणावरच्या स्त्रीमनाचा मागोवा घेतला आहे. प्रत्येक कथेतून काही संदेश मिळतो. "रांगोळी" या कथेचा शेवटचा भाग मला आवडला .जीवनाची रांगोळी विश्वासाचे बिंदू आणि तडजोडीच्या रेघांनी रेखाटावी लागते. समाधानाच्या फुलांनी सजवावी लागते. कथासंग्रह वाचनीय आहे.


Comments
Post a Comment