श्री देवधर यांची दिलदार मैत्री
आज मैत्री दिवस - Friendship Day .. १ ऑगस्ट .. माझे मन कॅनरा बँकेत LBA Section Circle Office सायन येथे काम करत असताना दिवसात गेले. आमच्या विभागातील माझे सारे सहकारी मित्र आणि मॆत्रिणी यांच्या एकमेकांची चेष्ठा-मस्करी, सुखसंवाद,कॅन्टीनमधील विशेष भजी यावर गप्पा मारत ताव मारणे विभागात खूप मजा असायची. आमच्या विभागाचे श्री देवधर साहेब हे कधीच साहेब बॉस या नात्यांनी न वागता ते नेहमीच आम्हा सर्वांचे "मित्र" या नात्यांनी वागून त्यांनी आमच्या विभागाचे सौंदर्य वाढवले होते. आमचा विभाग ऑफिसच्या प्रवेशद्वाराच्या अगदी उजव्या बाजूस होता. तेव्हा येता जाता सर्वाशी ते नेहमीच हसतखेळत सर्वाशी बोलून चौकशी करत. ऑफिसमधील अगदी पार्ट time स्टाफ पासून उच्च पदावरील वरिष्ठ (GM ) यांच्याशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. सर्व शाखाप्रमुखाशी त्यांचे सलोख्याचे संबंध असून प्रत्येकाना अडीअडचणीमध्ये मित्रत्वाचा सल्ला देऊन योग्य ते मार्गदर्शन करीत असत यांचे दर्शन मला झाले. काहीवेळा GM त्यांच्या टेबलापाशी आले असता ते शांतपणे उत्तर देत. तेव्हा मी त्यांना गमतीने म्हणत असे - काय हो तुम्ही सर सर ..करून बोलत नाही ...त्यावेळी ते मला सर सर करायला अजिबात आवडत नाही आणि मी कधीच कोणाला करत नाही असे ते मला ठामपणे सांगत. हे बघ CM - आपले काम प्रामाणिकपणे केले तर आपल्याला दुसऱ्या पुढे झुकावे लागत नाही. GM असलेतरी त्यांच्या केबिनमध्ये... केबिनबाहेर आलेवर साधारण स्टाफ... लोकलमधे एखादा वरिष्ठ सुटाबुटातील टाय पोशाखातील प्रवास करताना तो सामान्य प्रवासीच.. त्याला उभेच राहावे लागते नाही का ..? असे मला सांगत. बऱ्याच वेळा सायन ते बांद्रा स्थानक यापर्यंत मला रिक्षामधून घेऊन जायचे. मला कधीच रिक्षाचे भाडे देण्यासाठी संधी दिली नाही. कधीकधी मी पैसे दिलेतर ते मला आणि कधी चालकाला रागवत असत. मला म्हणायचे - " No sharing ". मग रिक्षा प्रवासात ऑफिस, संसारातील काही गमतीजमती, गप्पा शेयर करीत यामुळे बांद्रा स्टेशन कधी यायचे कळत नसे.मुबईची माणसे आणि लोकल यापासून मला बरेच काही शिकायला मिळाले.
वास्तविक LBA Section हा एक मानाचा विभाग आणि त्यांचा विभागप्रमुख हे मानाचे स्थान पण श्री देवधर यांनी कधीच तो तोरा मिजास याचे प्रदर्शन केले नाही. उलट सर्वाना एक आपला " हितचिंतक मित्र " वाटायचे. आम्हीपण त्यांची एक मित्राप्रमाणे चेष्ठा करीत असू. त्यांचा विनोदी स्वभावामुळे आमच्या विभागात नेहमी मजा आणि आनंदी वातावरण असायचे.
आज जवळजवळ २० वर्षे झाली पण ते मुबंईत असो, अगर बढतीनिमित्य हेड ऑफिस बेंगलोर मध्ये, निवृत्तीनंतर आपल्या कन्येकडे अमेरिकेत असो मला आवर्जून महिन्यातून एकदा तरी माझी आस्थेने विचारपूस आणि मुलाच्या शिक्षण प्रगतीबाबत मुद्दाम आपणहून फोन करतात. नाहीतर साधारणपणे बदली नंतर दोन वर्षात आपले सहकारी नातेसंबंध यात उतार पडतोच. काही लग्नसमारंभ प्रसंगी मुंबईच्या मित्रांच्या भेटीवेळी Cirle office गप्पावेळी श्री देवधर यांचा उल्लेखाशिवाय गप्पा पूर्ण होतच नाहीत. अश्या दिलदार व्यक्ती आपल्या जीवनात भेटणे, त्यांचा मित्रत्वाचा आनंद लाभणं ..त्यांचे प्रेम आणि आपुलकी मी कधीच विसरू शकत नाही. हे पाहता मी खरच नशीबवान...मला वाटते देवाने जणू मला कायमचे किमतीवान "प्रमोशन" जीवनात दिले ... नाही का ..
आज मैत्रीदिनाच्यानिमित्य माझ्या मनात मुंबईच्या आठवणींचा धुवाधार पाऊस पडला. मी आठवणीने चिंब भिजून गेलो आणि कृतज्ञतेचे अश्रूंची सर मी रोखू शकलो नाही. मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा... आपला लाडका CM ... ०१.०८.२०२१
Wonderful..could visualise your writing.
ReplyDelete