श्रेयसचे यश
जूनमध्ये श्रेयसने IIT प्रवेशसाठी मुलाखती दिल्या. निकालाची वाट पाहत होता. निवडीबाबत मनात शंका आणि श्रेयसला आणि वर्षाला दडपण होते. प्रथम ५ जुलै रोजी IIT रुरकी Ph D बाबत निवड झाल्याचा ई-मेल आला आणि घरी आनंदीआनंद होता.आमचे श्रेयससर लगेच डॉक्टर झाले.प्रोफेसर होण्याचे स्वप्न आता साकार होणार म्हणून खुश होता.IIT कानपुर काही मिळणार नाही म्हणून रुरकीची तयारी मनात सुरु केली. रविवारी वर्षाच्या मैत्रिणीने रुरकी प्रवेश बाबत आनंद सोहळा साठी चहापान कार्यक्रम झाला.हा एक जणू केळवण प्रकार पण खरे म्हणजे .. लेक चालली सासरला ...१२ जुलै रोजी संध्याकाळी IIT कानपुर येथे निवड झाल्याचा ई-मेल आला. आणि श्रेयसच्या आनंद गगनात मावेना.
श्रेयसला IIT कानपुर चा निवडीचा ई-मेल आल्यावर त्या रात्री आनंदाने त्याला अजिबात झोप लागली नाही. ९ मुलांपैकी तो एक होता.आता श्रेयस आणि वर्षा IIT च्या विशेष विमानाने हवेत उडत होते. मी मात्र घरी इंडियन रोड मॅप ऍटलास पुस्तक काढून रुरर्की आणि कानपुर कोणत्या राज्यात येतात (माझे भौगोलिक ज्ञान महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेपर्यंतच), आजूबाजूला कोणती प्रेक्षणीय स्थळे, रेल्वे मार्ग, पुण्यापासून अंतर या गोष्टी पाहत होतो.
रुरकी का कानपुर बाबत कोणता निर्णय याबाबत श्रेयसने आपल्या मित्रांना (देशात आणि परदेशात शिक्षण घेण्याऱ्या ), जाणकार, नातलग मंडळींना विचारणा केली. सर्वानुमते कानपुर इलेक्ट्रिकल विषयात प्रथम नंबर असल्यामुळे कानपूरला प्रथम पसंती द्यावी असे ठरले. कानपुर IIT नंतर धारवाड IIT आणि मंडी IIT या दोन्ही IIT मध्ये निवड झाल्याचा ई-मेल आला. एकूण IIT चा पाऊस पडला.
आज गुरुपुर्णिमा.. जन्मापासून आपल्या जीवनात प्रत्येक ठिकाणी आपल्याला भेटलेले नातलग, मित्र-मैत्रिणी, गुरुजन, सहकारी.. हे सारे गुरूच असतात .. त्यांचा आशीर्वाद, शुभेच्छा, आपल्या पूर्वजांची पुण्याई, कुलदेवतेची कृपा .. यामुळेच श्रेयसला भरघोस यश मिळाले. मला IIT मिळेल असे काही वाटत नव्हते. पण आपली नोकरी सांभाळून, ऑनलाईन कोचिंग क्लास, अभ्यास, मेहनत यामुळे मिळवलेल्या श्रेयसच्या यशाचे कौतुक आणि अभिमान वाटला. सर्वात महत्वाचे श्रेयसच्या मूड सांभाळत त्याची खानपान आणि इतर सेवा, मानसिक शक्ती, मार्गदर्शन देण्याऱ्या वर्षाचे कौतुक करावे तेवढे कमीच.. श्रेयसच्या आणि वर्षाच्या कष्ठाचे फळ मिळाले..मनस्वी आनंद झाला. आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक छोटासा प्रयत्न...श्री राम जय राम जय जय राम ..... २३ जुलै २०२१ - गुरुपुर्णिमा

Very nice narration.
ReplyDeleteVery glad to hear. Great achievement Shreyas. This is your sweet fruits of your hard work. By heart you have studied well, your vision is clear.
ReplyDeleteI am dam sure that you will achieve what you want to be.
Keep it up..stay safe, stay health our country requires a talented person like a you...
Shreyas you deserve this.Very very happy for your achievement.
ReplyDeleteCongratulations to you and also to your parents.God bless you.All the best for your future.
Usha Dutt and family
Keep it up our country need talented professors like you ALL THE BEST
ReplyDeleteFROM
MAHESH , SUSMITA AND ABHIRAJ
REGARDS
श्रेयस उच्च यश मिळवत राहील याबद्दल शंकाच नाही. सरळमार्गी व संस्कारी लोकांचे आयुष्य यशाच्या शिखराकडे निश्चित नेतेच. आमच्या कडून शुभेच्छा.
ReplyDeleteश्रेयस नक्कीच चांगली प्रगती करेल यात शंकाच नाही! IITच्या selection बद्दल श्रेयस मागे बोलला होता, पण आज काका, हा तुमचा ब्लॉग वाचून फार छान वाटलं. शुभेच्छा आहेतच!
ReplyDeleteअभिनंदन तुम्हा तिघांचे.. खूप घवघवीत यश मिळाले श्रेयस ला. त्याचे खूप कौतुक... आणि खूप आशिर्वाद..
ReplyDeleteश्रेयस तुझे खूप खूप अभिनंदन आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी अनेक आशिर्वाद
ReplyDeleteनीराआजी व आम्ही सर्व
Shekhar your writing style is so open and honest..I always enjoy reading your write ups....this time subject ie shreyas 's success is close to your heart ...so it is much more interesting..we all are proud of you brother .Shreyas has taken forward the name of our family which is very proud of good education and honesty..Keep it up..God bless you
ReplyDeleteMany Congratulations to you Sir. Your Son has proved his mettle through his hardwork and your blessings have paved his way.
ReplyDeleteश्रेयस तुझं कौतुक करावं तितकं थोडं आहे. तुझी शैक्षणिक घोडदौड तर गेली अनेक वर्षे मी पाहत आहेच पण तुझ्या सभ्य, सुसंस्कृत, नम्र स्वभावाचे मला नेहमीच अप्रूप आणि कौतुक वाटते.
ReplyDeleteतुझ्या बाबांनी तुझं केलेलं कौतुक अतिशय सार्थ आहे.तुझ्या वयात इतकी परिपक्वता आणि प्रगल्भता सहसा पाहायला मिळत नाही.तुझ्या आईबाबांनी तुझ्यावर अतिशय उत्तम संस्कार केलेले आहेत आणि ते तू अंगी बाणवले आहेस हे फार कौतुकास्पद आहे. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. अशीच यशाची शिखरे सर करत राहा.
Great achievement!
ReplyDeleteKeep up and excel!