ममता सावजी - श्रद्धांजली
सिल्व्हरक्रेस्ट सोसायटी मधील आनंदाची, दुःखाची, उत्सवाची, पाणी सूचना याबाबत माहिती फलकावर थोडक्यात सुंदर अक्षरात लिहिणे हे काम ममता सावजी आनंदाने करीत असत. आता ती अक्षरे पडद्याआड गेली. ममता सावजी सिल्व्हरक्रेस्ट सोडून देवाघरी गेल्या.. ही बातमी ऐकली आणि मनास धक्का बसला. ममता विज्ञान आणि गणित उत्तम शिकवायच्या. दहावी मार्गदर्शन, अभ्यास, वेळापत्रक याबाबत सोसायटी मधील मुलांना मार्गदर्शन करीत. दहावीमध्ये मुलांच्या भरघोस यशात सिंहांचा वाटा असायचा.
कामातील नीटनेटकपणा , वेळेचे व्ययस्थापन, परखडपणा, थोड्यक्यात पण स्पष्ट मत व्यक्त करणे, नियमित चालणे, टेकडी भ्रमंती, कविता करणे, रांगोळी, हौशी वृत्ती, प्रसन्न व्यक्तीमत्व ,आपले काम भले आपण भले..गुण मला भावले.. दररोज ऑफिसला जिन्यावरून जाताना त्यांच्या सुंदर आखीव रेखीव रांगोळीचे दर्शन घडत असे. मनास बरे वाटे. रांगोळीत "श्री राम" शब्द असायचे.. आता आपल्याला कायमचा " राम राम " केला . असो.
सोसायटी कमिटीमध्ये असताना खजिनदार, विंग प्रतिनिधी अश्या पदावर असताना उत्तम काम केले. गणपती उत्सवात आणि सर्व सांस्कृतिक उत्सवात, खेळ, स्पर्धा यांचे आयोजन, स्वच्छता, आणि इतर सोसायटीची कामे यात आनंदाने सहभाग असायचा. आपल्या कामात वेळ काढून सोसायटीमधील इतर कुटुंबाना मदत करणे, मार्गदर्शन करणे हे आवडीने करत. आठवणी कराव्या तितक्या कमीच.. त्यांनी दिलेले योगदान सोसायटी कधीच विसरू शकत नाही. प्रत्येकाने आपल्याला जमेल तितकी मदत सहकार्य सिल्व्हरक्रेस्ट कमिटीस करणे हीच खरी श्रद्धांजली... नाही का ...
आपण सर्वाना श्री सावजी कुटुंबास भेटून सांत्वन करावे असे वाटत असले तरी सध्याच्या करो ना लाटेमुळे आपण भेटणे टाळू या. ममता सावजी यांच्या आत्मास शांती लाभो .. श्री सावजी कुटुंबियांना मानसिक आणि शारीरिक शक्ती लाभो हीच प्रार्थना आपण आपल्या घरीच बसून देवाकडे मनोभावे व्यक्त करू या. आपल्या सोसायटीच्या वतीने ममता सावजी यांना अखेरचा सलाम...श्री राम जय राम जय जय राम .. ओम शांती ..
चंद्रशेखर मधुकर कुलकर्णी - E 302 - 06.05.2021
अमरावती च्या एवढेच ऐकून होतो. प्रत्यक्षात भेट झाली नाही. त्यांचे कार्य नक्कीच प्रेरणादायी ठरेल. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
ReplyDelete