डॉ. संजय मालपाणी यांचे गीतेवरचे विचार

 


जनजाती कल्याण आश्रम, नगर शाखा आयोजित कै. ग. म. मुळे स्मृती व्याख्यानमाला

*विषय - सामाजिक उद्बोधन आणि समुपदेशनचा ग्रंथ  -भगवद् गीता *

वक्ता - डॉ. संजय मालपाणी  ( राष्ट्रीय कार्याध्यक्ष - गीता परिवार)  -

झूमवर २२.०५.२०२१ रोजी होते. व्यवस्थापन आणि मानसशात्र यांची सूत्रे गीतेत आहेत. धर्माचा खरा अर्थ कर्तव्य. अपयशातून आलेले शहाणपण म्हणजे स्वर्ग,. अनुभवांनी समृद्ध म्हणजे स्वर्ग.. एकापेक्षा अनेकांचा विचार करायला लावणारा ग्रंथ म्हणजे गीता.. नेतृत्व करण्याऱ्याच्या अंगी प्रसन्नता हवी. ऐकण्याची सवय हवी.  मतांतरे होतात पण मनभेद होता कामा नये. सामाजिक क्षेत्रात काम करताना मनात वैरत्व भावना नको.

यद्यआचरती श्रेष्ठ ... आपले वागणे, बोलणे, चालणे श्रेष्ठ हवे.   कर्मण्ये वाधिकारस्ते ... चांगले काम करा.  कर्तव्यात कसूर नको. झटपट प्रसिद्धीची आशा नको. आपल्या कामाच्या सुगंधाने आपली ओळख बनवा. कोणतेही काम करताना लाज बाळगू नका. मोक्षाची प्राप्ती हेच परमपद ..आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करीत रहा. 

निराशा, दुःख नेहमी बाहेरून येते. मनातून येतो तो आनंद.. सुखाचे शेवटचे टोक दुःख .. आनंदाचे टोक परमानंद.. शांत चित्ताने विचार करावा. मनाची प्रसन्नता यामुळे  - बुद्धी स्थिर होते. अपॆक्षातुन बाहेर पडा. अपेक्षा दुःख निर्माण करतात.  दुःख काल साक्षेप असते. Time related .. ते येते आणि जाते.  त्याचा अवधी कमी करणे मनावर अवलंबून असते.  सुखे दुःखे समे कृत्वा... मन प्रसन्न करून जगणे महत्वाचे... समत्व भाव ..मन चंचल आहे. पण अभ्यासाने स्थिर समत्व भाव जमू शकतो.  गीतेचा अभ्यास करावा. नुसते वाचणे नको .. जीवनात आचरणात आणायला हवी.  व्याख्यान थोडक्यात पण छान श्रवणीय होते.


Comments

  1. गीतेसारखा मार्गदर्शक आपल्या जवळ आहे, हे आपले परमभाग्य.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा