मी काय वाचले - ५
व्यासपर्व - लेखिका दुर्गा भागवत
महाभारतातील काही व्यक्तीमत्वावर दुर्गाबाईंनी आपले विचार व्यक्त केले आहेत. पूर्णपुरुष कृष्ण ही सर्वात मध्यवर्ती आकृती आहे. व्याधाचा बाण लागून, मुलगा, सवंगडी, भाऊ, वादक, प्रियकर, योद्धा, पती, राजा, राजकारणपटू वक्ता, तत्वज्ञ या साऱ्या भूमिकांत अपरंपार रस ओतून कृष्णाने शेवटी या साऱ्यांची परमावधी साधा माणूस म्हणून मरण पत्करण्यातच गाठली. आसक्ती आणि विरक्ती यांची परमावधी त्याने कुशलतेने गाठली. द्रोण, अश्वथामा, दुर्योधन, कर्ण, अर्जुन, युधिष्ठीर, भीष्म, विदुर, द्रौपदी या व्यक्तीवर सुंदर लेखन केले आहे. व्यासांचे विविध पात्रावर लेखनाबाबत भरभरून कौतुक केले आहे.
व्यासांनी स्त्री जातीचे सनातन तेज आणि दौबर्ल्या द्रौपदीच्या रूपाने मनोतज्ञेतेने रेखाटले आहे. प्रीती आणि रती, भक्ती आणि मैत्री, संयम आणि आसक्ती या भावनांच्या द्वंदातला सूक्ष्म तोल द्रौपदीच्या व्यक्तीमत्वात जसा आढळून येतो तास अन्य कोणत्याही पौराणिक स्त्रीत आढळत नाही म्हणूनच द्रौपदीचे मन हे एक अतिशय स्फुरणारे मन आहे. त्यात विलक्षण पाशवी चैतन्य आहे. द्रौपदी सर्वात दिसायला अतिसुंदर...
युधिष्ठीर एकदा अर्जुनाला म्हणतो - मी शास्त्रे शिकलो आहे. वेद, धर्म सारे काही शिकलो आहे. तू अस्त्रेच शिकला आहेस. शास्त्राचा अर्थ तुला कधीच समजणार नाही. धर्माचे सूक्ष्म स्वरूप तुला कळायचे नाही. तू वृद्धांची सेवा केलेली नाहीस. तू नुसतेच युद्ध जाणतोस. धन सर्वात श्रेष्ठ ही तुझी समजूत चुकीची आहे. तपच सर्वात मोठे. ऋषींना त्यानेच गती मिळाली. तपाने खूप मिळते.बुद्धीने महान श्रेय प्राप्त होते. त्यागातच सुख आहे. युधिष्ठीर चांगला माणूस राहिला. पण इतरापैकीच एक - आणि कदाचित तितकाच अनामिक. त्यामुळेच आपण अर्जुन विसरतो, भीम विसरतो, पण युधिष्ठीर विसरू शकत नाही. हे पुस्तक वाचनीय आहे.
Comments
Post a Comment