प्रसंगी अखंडित वाचीत जावे
''हातातलं पुस्तक खाली ठेवलं नाहीस, तर मी ते चुलीतच घालीन.' स्वयंपाकघराच्या एकाकोपऱ्यात बसलेल्या मला आईच्या वस्सकन ओरडण्यानं आणि पाठीवर बसलेल्या फटक्यानं वास्तवाचं भान आलं. 'आपण वाचतोय आणि ते इतरांच्या दृष्टीनं चुकीचं आहे, याची जाणीव तेव्हा झाली. तोपर्यंत इतर दैनंदिन गरजांइतकीच वाचन ही माझ्या दृष्टीने अपरिहार्य असणारी गोष्ट माझ्या हातून होत होती." हे उद्गार आहेत कॅथरित कुकसन या इंग्रजी लेखिकेचे! (नुकतीच ९१ व्या वर्षी ती मृत्यू पावली.) वयाच्या ४१ व्या वर्षी लेखनाला सुरुवात करीपर्यंत केवळ वाचन हा तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता. त्यासाठी बेसुमार छळ तिनं सोसला होता, पुस्तकांची चोरी करण्यासारखे अपराधही केले होते.
वरील परिच्छेद - "प्रसंगी अखंडित वाचीत राहावे! -" ग्रंथ गोफ सदरातील मीना वैशंपायन यांच्या लेखातील आहे. जुनी कात्रणे चाळीत असताना हे वाचन आणि ग्रंथप्रेमी वाचकांसाठी लिहिले आहे. पूर्वी १९९३-९४ साली महाराष्ट्र टाइम्स वर्तमानपत्रात "ग्रंथाच्या सहवासात" हे रविवारी सदर असायचे त्यात प्रसिद्ध व्यक्तीचे विचार आणि त्यांनी वाचलेली पुस्तके यांचा उल्लेख आहे. ही दुर्मिळ कात्रणे संग्रही आहेत.
ग्रंथ गोफ सदरात लेखिका म्हणते - कोलरिज या कवीच्या मते वाचकांचे प्रकारात - काही वाचक मात्र खानदानी हिऱ्याप्रमाणे दुर्मिळ आणि मौल्यवान असतात. आपल्या वाचनापासून ते स्वतःचा फायदा करून घेतातच, पण इतरांनाही फायदा करून देतात.
आज २३ एप्रिल जागतिक पुस्तक दिन - सर्व वाचनप्रेमींना या ग्रंथदिनाच्या हार्दिक शुभेच्छा....
Comments
Post a Comment