सावधान .. माझी वार्षिक परीक्षा ...



6 एप्रिल 2021रोजी डायबेटिक असोसिएशन येथे माझ्या शरीराची वार्षिक परीक्षा झाली. श्री दत्त महाराज यांचे दर्शन घेऊन सकाळी 8 वाजता परिक्षा केंद्रावर हजर झालो. माझ्या fasting, ECG परिक्षा सुरू झाल्या. चहा पाणी यासाठी थोडा वेळ होता. 9.30 वाजता दाताची टेस्ट होती. दात सगळे व्यवस्थित आहे असे डॉ.नी सांगितले.तपासून झाल्यावर    "काका, आज माझा वाढदिवस मला आशिर्वाद द्या " असे सांगून डॉक्टरीण मुलीने आमच्या पाया पडून चॉकलेट दिले (साखरेचे खाणार त्याला देव देणार..). सुखी समाधानी आणि भरभराट असा आशिर्वाद देऊन वाढदिवसानिमित्त माझ्या दाताची शक्ती वाढू दे अशी मनोमनी प्रार्थना केली..


दुपारी जेवण करून परत १ वाजता परीक्षा केंद्रावर हजर. एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये विविध प्रकारच्या टेस्ट्स झाल्या. डोळे, पाऊल,pp , रक्तदाब,आहारतज्ज्ञ यांचा सल्ला, व्यायाम बाबत मार्गदर्शन, वगैरे ...शेवटी ४ वाजता निकाल लागला.  मधुमेह, बी-१२,triglyeceride  या विषयात माझी कामगिरी मनासारखी समाधानकारक नव्हती. बाकी विषयात उत्तम मार्क्स पडले. अर्थात मधुमेह, triglyeceride या विषयात निकाल अपेक्षित होता. कारण मी या विषयात काठा वर होतो. शेवटी प्रमुख परीक्षकांनी मधुमेहासाठी गोळी आणि पथ्थ याबाबत सांगितले. डायबेटिक संस्थेत सकाळी दुपारी चहा आणि इतर सोयी उत्तम आहेत. मनास समाधान वाटले.   नंतर ५ वाजता देवयानी हॉस्पिटलमध्ये आमचा Covishied लस नंबर होता. म्हणून तिथे लस घेऊन घरी आलो. 


आमच्या भागातील  मधुमेह तज्ज्ञ मास्तरीणबाई यांचेकडे जाऊन एक महिन्याची शिकवणी सुरु केली. एक महिन्यासाठी गृहपाठ दिला. निम्मे आयुष्य गोळीविना गेले यांचे समाधान मान असे देव म्हणाला. पुढचे आयुष्य गोळी, नित्य आहार, विहार, पथ्थ पाणी सांभाळून रहा .. असे देव म्हणाला ..तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ..शेवटी मला भावलेली सद्गुरू श्री वामनराव पै यांची प्रार्थना -  हे ईश्वर सर्वाना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वाना सुखात आनंदात ठेव..सर्वांचे भले कर कल्याण कर आणि तुझे नाम अखंड मुखात राहू दे....श्री राम जय राम जय जय राम ..ही प्रार्थना व्यक्त करून मी माझ्या शरीराचे कौतुक थांबवतो....

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा