कामिकोची - मात्सुमोटो कॅसल प्रवास
27.10.2025 रविवारी सकाळी ७ वाजता आम्ही नाश्ता करून हॉटेल सोडून कामिकोचीकडे प्रयाण केले. कामिकोची हे हिडा पर्वतात वसलेली खोरी - कामिकोची जवळजवळ १८ km परिसर आणि ४६०० ft समुद्रापासून उंच ठिकाण. या भागातून azusa (जपानमधील लांब नदी) आणि Shinano नद्या वाहतात. Yake पर्वताच्या पायथाशी ज्वालामुखीचा उद्रेक होऊन नैसर्गिक तळे तयार झाले त्याला Taisho Pond म्हणतात. याभागात Myojin Pond आणि Takezawa तळी आहेत. येथील वाहते पाणी उन्हाळ्यात पण थंडगार असते. Taisho pond पासून आम्ही पायी सुरुवात केली. हा सगळा जंगल भाग. आजूबाजूस उंच वृक्ष, औषधी वनस्पती, फुलांची झाडे.. काही भागात लाकडी पूल बांधले.. जाण्यायेणासाठी लाकडी पायवाट सोय.. ठिकठकाणी भागाचे नाव आणि वैशिट्य माहिती फलक.. काही भागात विश्रांतीसाठी बसण्याची सोय.. इतर भागाचे नकाशे .. सगळीकडे कमालीची स्वच्छता - कोठेही वेफेरचे कागद, प्लास्टिक बाटली सापडत नाही. कामिकोची भाग हा Chubu - Sangaku National Park म्हणून ओळखला जातो. विशेष नैसर्गिक पर्वत आणि विशेष निसर्गरम्य सौंदर्य ठिकाण यामुळे प्रसिद्ध आहे. येथील निसर्ग सौंदर्य...